Mormugao CCTV Dainik Gomantak
गोवा

Mormugao: ‘सीसीटीव्‍ही'ची दहशत! मुरगाव चिकन मार्केटलगत कचराफेकूंचे प्रमाण घटले; ‘गोवा बागायतदार’जवळ मात्र 'जैसे थे' अवस्था

Mormugao Garbage Problem: मुरगाव नगरपालिकेने चिकन मार्केटलगतच्या कचरा संकलन केंद्रासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने तेथे कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Sameer Panditrao

वास्को: मुरगाव नगरपालिकेने चिकन मार्केटलगतच्या कचरा संकलन केंद्रासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याने तेथे कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र गोवा बागायतदार संस्थेजवळील रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा कमी होण्याचे नाव घेत नाही. उलट दिवसेंदिवस तेथे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे.

सदर ठिकाणी दुचाकी पार्किंगची जागा आहे. परंतु तेथे कचरा टाकण्यात येत असल्याने दुचाकी उभ्या करता येत नाहीत. उलट तेथे दुचाकी उभ्या करू नका, ही कचरा टाकण्याची जागा असल्याचे कंत्राटी सफाई कामगार सांगतो. याचा अर्थ मुरगाव पालिकेने तेथे कचरा टाकण्यास मान्यता दिल्याचे स्पष्ट होते. मात्र दुचाकी पार्किंगसंबंधी जी अधिसूचना काढण्यात आली आहे, तिचे काय, हा प्रश्‍‍न उपस्थित होतो.

चिकन मार्केटलगतच्या कचरा संकलन केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत होता. सदर कचरा उचलण्याचे काम सफाई कामगारांना करावे लागत होते. याप्रकरणी वारंवार विनंत्या, तक्रारी करूनही काहीच झाले नाही. रात्रीच्या वेळी वाहनांतून कचरा आणून तेथे टाकला जात होता. मुख्याधिकारी दीपेश प्रियोळकर, नगरसेवक नारायण बोरकर यांनी दखल घेऊन तेथे सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्यामुळे तेथे रात्रीच्या वेळी उष्टे, पत्र्यावळ्या तसेच इतर वस्तू दुचाकीवरून आणून टाकणाऱ्या एका व्यक्तीचे चित्रण कॅमेऱ्यात कैद झाले. त्याला दहा हजार रुपये दंड फेडावा लागला.

सदर बातमी पसरताच इतरांनी तेथे कचरा टाकण्याचे बंद केले. मात्र अजूनही काहीजण तेथे कचरा टाकण्याचे धाडस करतात. मात्र हे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे तेथील कामगार तसेच चिकनविक्रेतेही समाधान व्यक्त करत आहेत. तो भाग आता स्वच्छ दिसत आहे. दुर्गंधीचे प्रमाणही कमी झाले आहे.

मात्र गोवा बागायतदारलगतच्या रस्त्यावर टाकण्यात येणारा कचरा बंद करण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. कुजलेली भाजी, फळे तसेच इतर टाकाऊ वस्तूंचा मोठा ढीग तेथे असतो. तो कचरा उचलण्याचे काम पालिकेचे पाच-सहा कामगार करतात. भाजी मार्केटातील विविध विक्रेत्यांचा कचरा गोळा करण्यासाठी मुरगाव पालिका कचरा शुल्क आकारत आहे.

मुरगाव पालिकेचे कामगार वाहनासह प्रत्येक दुकानासमोर जाऊन कचरा गोळा करून वाहनात टाकतात. जर कामगार तेथील कचरा गोळा करतात, तर गोवा बागायतदारलगतच्या रस्त्यावर जमा होणारा कचरा कोणाचा? हा प्रश्न निर्माण होत आहे.

तेथे पादचारी, दुचाकीवाहनचालकांना दुर्गंधी सहन करावी लागते. दुचाकी वाहने पार्किंगचा फलक तेथे आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने कचऱ्यातच वाहने उभी करावी लागतात.

दुसरीकडे सफाई कामगार ती वाहने तेथून हटवितो. यासंदर्भात विचारणा केल्यास ती जागा कचरा टाकण्याची आहे असे सांगितले जाते. त्यामुळे दुचाकी वाहनचालक तेथे वाहन उभे करावे की नाही या विवंचनेत पडतात.

ती जागा जर कचरा टाकण्यासाठी असेल तर वाहतूक पोलिसांनी तेथे लावलेला दुचाकी पार्किंगचा फलक हटवून ‘नो पार्किंग’चा फलक लावावा अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT