Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Goa IRB Constable Arrested: शासकीय सेवेत नोकरी मिळवल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी गोवा इंडिया रिझर्व्ह बटालियन (IRB) मधील एका कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल केला.
Goa Fake Police
Goa Fake PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa IRB Constable Arrested: बनावट कागदपत्रांचा वापर करुन शासकीय सेवेत नोकरी मिळवल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी गोवा इंडिया रिझर्व्ह बटालियन (IRB) मधील एका कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अरुण येदनापुडी (Aroon Yeddanapudi) असे आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे.

पणजी पोलिसांनी त्याच्यावर फसवणूक (Cheating) आणि बनावटगिरी (Forgery) केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. कॉन्स्टेबल अरुण येदनापुडी याने पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी आंध्र प्रदेशातील बनावट जन्म दाखला (Fake Birth Certificate) वापरल्याचा आरोप आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर, प्राथमिक चौकशीत हा जन्म दाखला बनावट असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पणजी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.

Goa Fake Police
US Job Fraud: अन्न-पाणी नाही, मेक्‍सिकोचे जंगल, अमेरिकन सैनिकांची गस्‍त; गोव्यातून परदेशात नोकरीसाठी गेलेल्यांची कशी झाली फसवणूक?

या कॉन्स्टेबलची नेमणूक कधी झाली, त्याने हा बनावट दाखला कसा मिळवला आणि या फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत. शासकीय नोकरी मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचे हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

investors cheated with promise of high returns
Fake call centers in Goa
goa crime branch busts two fake call centers
Saligao Police Raid
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com