Margao: सावधान! उघड्यावर कचरा फ़ेकताय? मडगावात CCTV ठेवणार बारीक लक्ष

Margao Grabage Issue: मडगाव पालिका क्षेत्रात उघड्यावर बेकायदेशीररीत्या कचरा आणून फेकण्याचे प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहेत.
Margao News
CCTVDainik Gomantak
Published on
Updated on

CCTV monitoring for waste disposal Margao

मडगाव: मडगाव पालिका क्षेत्रात उघड्यावर बेकायदेशीररीत्या कचरा आणून फेकण्याचे प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. यामुळे ब्लॅक स्पॉट्स तयार झाले आहेत. अशाप्रकारे उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रकार थांबावेत म्हणून पालिकेने दंडात्मक कारवाई केली, तरी हे प्रकार चालूच असल्याने पालिकेने आता यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मात्रा आजमावून पाहण्याचे ठरविले आहे.

मडगाव आणि फातोर्ड्यातील कचरा फेकण्याचे प्रकार ज्या परिसरांत जास्त करून आढळून येत आहेत आणि जे एक प्रकारे ब्लॅक स्पॉट्स बनले आहेत तेथे कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविले असल्याची माहिती पालिका अभियंता दीपक फळदेसाई यांनी दिली. याव्यतिरिक्त अधूनमधून कारवाई मोहिमा राबविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Margao News
Margao Fish Market: 'सोपो' कोण गोळा करणार? मडगाव मासळी मार्केटमधील कंत्राटदारांमध्ये वाद

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी खुल्या जागेत कचरा फेकण्यासाठी येणारे कॅमेऱ्यांत बंदिस्त होतील. त्यामुळे कारवाई करणे अधिक सुलभ होईल तसेच असे प्रकार नियंत्रणात आणणे शक्य होईल, अशी आशा अभियंता फळदेसाई यांनी व्यक्त केली.

Margao News
Margao: मडगावात सांडपाणी वाहिनीचे 75 टक्‍के काम पूर्ण; कामत यांनी घेतली बैठक

कोंब येथे कचऱ्याची रिक्षा पकडली, २० हजारांचा दंड

पालिका अभियंता फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षभरात कारवाई मोहिमा राबवून कित्येक प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. सुमारे ३ लाख रुपये दंडाच्या स्वरूपात गोळा करण्यात आले आहेत. पाच दिवसांपूर्वीच स्वच्छता निरीक्षक संजय सांगेलकर यांनी कोंब भागातील रिंग रोडच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी एक रिक्षा भरून कचरा उघड्यावर टाकण्यासाठी आणला असता रंगेहाथ पकडले. पालिकेने रु. २० हजारांचा दंड या रिक्षाचालकाला ठोठावला. अशा प्रकारच्या कारवाई मोहिमा राबविण्यासाठी पालिकेच्या कनिष्ठ तसेच साहाय्यक अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली पथके तैनात केली असून लवकरच ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे फळदेसाई यांनी नजरेस आणून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com