

Team India Reocrd: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना 48 धावांनी जिंकून टीम इंडियाने मालिकेतील पराभवाचा धोका टाळला. आता टीम इंडियाचे लक्ष्य मालिका विजयावर असून मालिकेचा 5वा आणि निर्णायक टी20 सामना 8 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथील गाबा (Gabba) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाने या मालिकेत आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. टीम इंडियाने ही मालिका जिंकल्यास पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल यात काही शंका नाही.
टीम इंडियाला मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळायचा आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत केवळ एकच सामना खेळला आहे. हा एकमेव सामना 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS Method) 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. डीएलएस नियमानुसार भारताला 17 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु टीम इंडिया (Team India) केवळ 169 धावांपर्यंतच पोहोचू शकली होती.
ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर यजमान ऑस्ट्रेलियाचा टी20 आंतरराष्ट्रीयमधील विक्रम अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे निर्णायक सामन्यात टीम इंडियाला मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर आजवर एकूण 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाला या मैदानावर शेवटचा पराभव 2013 मध्ये वेस्ट इंडिजकडून 27 धावांनी पत्करावा लागला होता. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने गाबावर 5 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचा हा अभेद्य विक्रम पाहता, त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर मात देणे टीम इंडियासाठी सोपे आव्हान नसणार आहे. भारताच्या (India) युवा फलंदाजांना आणि गोलंदाजांना या निर्णायक लढतीत आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागणार आहे.
टीम इंडिया गाबावर ऑस्ट्रेलियाचा हा दबदबा मोडून काढण्यात आणि मालिका आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.