Nitin Gadkari In Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa: दक्षिण गोव्याची Connectivity सुधारणार! मुरगाव उड्डाणपुलाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन, 5 विकासकामांचे भूमिपूजन

Nitin Gadkari: विविध सहा कामांसाठी एकूण ४२०० कोटी रुपये खर्च केले जाणार असून, यात ५८ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित केले जाणार आहेत.

Pramod Yadav

वास्को: मुरगावातील आठ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी (२१ जानेवारी) होणार आहे. ६४४ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेला हा महामार्ग रविंद्र भवन ते मुरगाव पोर्टच्या गेट नंबर ९ पर्यंत थेट कनेकटीव्हिटी प्रदान करणार आहे. याशिवाय इतर पाच कामांचे भूमिपूजन देखील मंत्री गडकरींच्या हस्ते होईल.

रविंद्र भवन, वास्को येथे २१ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हा उद्घाटन समारंभ पार पडेल. या उद्घाटन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह इतर मंत्री आणि नेते हजेरी लावतील.

राष्ट्रीय महामार्ग ५६६ चा भाग असणाऱ्या या उड्डाणपुलाची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. अखेर या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारी गडकरींच्या हस्ते त्याचे लोकार्पण होत आहे.

रविंद्र भवन ते एमपीटी गेट नंबर नऊपर्यंत असलेल्या आठ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे शिवाय प्रवाशांना थेट कनेक्टीव्हिटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

'या' विकासकामांचे होणार भूमिपूजन

१) एमईएस महाविद्यालय जंक्शन ते बोगमाळो जंक्शन आणि क्वीनी जंक्शन या ४ किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचे भूमिपूजन. या कामासाठी ४७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

२) झुआरी पुलापासून ते मडगाव बगल मार्गापर्यंतच्या चौपदरी महामार्गाचे काम. सात किलोमीटर लांबीच्या या कामासाठी ३९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

३) नावेली ते कुंकळ्ळी चार पदरी मार्गाचे भूमिपूजन. सात किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी ७४७ कोटी रुपये खर्च होणारयेत.

४) बेंदुर्डे ते पोळेपर्यंतच्या २२.१० किलोमीटर लांबीच्या चौपदरी महामार्गासाठी १,३७६ कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे.

५) तसेच, फोंडा ते भोमा या १० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे देखील भूमिपूजन होणार असून, यासाठी ५५७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मंत्री गडकरींच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन होणाऱ्या विविध सहा कामांसाठी एकूण ४२०० कोटी रुपये खर्च केले जाणार असून, यात ५८ किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित केले जाणार आहेत. या नव्या मार्गांमुळे दक्षिण गोव्यातील दळणवळण आणखी सुधारणार आहे. शिवाय वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने हे मार्ग महत्वाचे ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT