
बोरी: कासावली येथील समुद्री बेटावर खडकांच्या सान्निध्यात सेल्फी घेण्याचा मोह एका युवकाच्या जीवावर बेतला आणि सेल्फी घेताना तो घसरून खाली असलेल्या मोठ्या खडकावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या सचिन धनंजय नाईक बोरकर या ३६ वर्षीय युवकाला प्राणाला मुकावे लागले. तो तारीभाट - बोरी येथील रहिवासी होता.
ही हृदयद्रावक घटना रविवारी (१९ जानेवारी) संध्याकाळी घडली. सचिन नाईक हा मनमिळाऊ वृत्तीच्या आणि इतरांच्या मदतीला धावणारा अशा वृत्तीचा असल्याने तारीभाट बोरी भागात शोककळा पसरली आहे.
एक सेल्फी घेऊन येतो, असे सांगून सचिन कातळाच्या दिशेने गेला. तेथे सेल्फी काढताना सचिनचा पाय घसरल्याने तो उंचावरून खाली खडकावर पडला. उंचावरून पडून खडकाला जोरात आपटल्याने सचिनच्या डोक्याला व शरीराच्या इतर अवयवांना जबर मार बसला.
इतरांनी त्वरित धाव घेऊन सचिनला गंभीर जखमी अवस्थेत लगतच्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले, पण प्रकृती गंभीर बनल्याने त्याला बांबोळी इस्पितळात पुढील उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान सचिनचे निधन झाले.
सचिनला आईवडील आणि दोन भाऊ आहेत. वडिलांचे दुकान असून सचिन खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. लोककलेशी निगडित असलेला सचिन हा ढोल ताशा उत्कृष्टरित्या वाजवायचा. आवेडेकर शिमगोत्सव मंडळाचा तो सक्रिय कार्यकर्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त असलेला सचिन शिवगर्जना संघटनेचा संस्थापक होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.