Mopa Parking Fee Dainik Gomantak
गोवा

Mopa Parking Fee: '..आम्ही घर कसे चालवू'? टॅक्सीचालकांची आर्त हाक; मोपावरील शुल्कवाढीबद्दल तीव्र नाराजी

Mopa Airport Taxi Issue: टॅक्सी पार्किंग शुल्क कंपनी कुणाच्या फायद्यासाठी वाढवत आहे आणि याकडे सरकार का लक्ष देत नाही? सरकारने यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केली.

Sameer Panditrao

मोरजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जीएमआर कंपनी वारंवार पार्किंग शुल्क वाढवून टॅक्सी व्यावसायिकांसमोर अडचणी निर्माण करत आहे. वारंवार टॅक्सी पार्किंग शुल्क कंपनी कुणाच्या फायद्यासाठी वाढवत आहे आणि याकडे सरकार का लक्ष देत नाही? सरकारने यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सुनील नाईक, रामा वारंग, निखिल महाले यांनी आपल्या समस्या पत्रकारांसमोर मांडल्या. मोपा विमानतळावरून कळंगुट भागात जर एक भाडे घेऊन गेलो, तर बाराशे ते पंधराशे रुपये मिळतात, त्यातून आम्ही वाहनांचे हप्ते कसे भरणार? संसार कसा चालवणार? आणि पार्किंग शुल्क कसे देणार? याकडे सरकार का लक्ष देत नाही? पार्किंग शुल्क वाढवून कोणाचा फायदा केला जातो? असा सवाल टॅक्सी व्यावसायिक निखिल महाले यांनी केला.

मोपा विमानतळ प्रकल्पासाठी येथील भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्या जमिनीचा अजून मोबदला शेतकऱ्यांनी घेतलेला नाही. अशा भूमिपुत्रांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी टॅक्सी व्यवसाय सुरू केला आहे, परंतु जीएमआर कंपनी वारंवार आम्हाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या भूमिपुत्रांनी जमिनी देऊन मोपा विमानतळासाठी मोठा त्याग केला. त्या त्यागाचा मोबदला जीएमआर कंपनी अशी आम्हाला देत आहे का? असा सवाल टॅक्सी व्यावसायिकांनी केला.

उत्तर गोवा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सुनील नाईक यांनी सांगितले, की सोमवारपासून जाहीर करण्यात आलेली शुल्कवाढ लागू करू नये यासाठी आम्ही मोपा पोलिस स्थानकाला निवेदन दिले आहे. आज कंपनीचे कार्यालय बंद असल्याने हे निवेदन पोलिस स्थानकात देऊन शुल्कवाढ न करण्याची मागणी केली आहे. जीएमआर कंपनीने सुधारीत शुल्कवाढ मागे न घेतल्यास आम्हाला सर्व टॅक्सी व्यावसायिकांना बरोबर घेऊन मोठ्या प्रमाणात कृती करावी लागेल.

कंपनीकडून दादागिरी

टॅक्सींना पार्किंग शुल्क वाढविण्यापूर्वी जीएमआर कंपनीने सरकार, स्थानिक आमदार व सरपंचांकडे चर्चा करून हा विषय सोडवणार असल्याची ग्वाही दिली होती. परंतु आता या कंपनीकडून दादागिरी सुरू केली असून कोणालाही विश्वासात न घेता पार्किंग शुल्क वाढविले आहे. सरकारने यावर गांभीर्याने विचार करून जे सुशिक्षित युवक टॅक्सी व्यवसायामध्ये आहेत, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी यावेळी टॅक्सी व्यावसायिकांनी केली.

८० वरून २०० रुपये शुल्कवाढ

जीएमआर कंपनीने ११ ऑगस्टपासून नवीन पार्किंग शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या टॅक्सी पार्किंगच्या शुल्कात आता ३० टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनी ही तिसऱ्यांदा पार्किंग शुल्कवाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी ८० रुपये शुल्क होते, त्या जागी आता २०० रुपये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पार्किंग शुल्क वाढवून जीएमआर कंपनी आम्हाला हाकलून तरी देण्याचा प्रयत्न करत नाही ना? असा सवाल टॅक्सी व्यावसायिक रामा वारंग यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT