Mopa Airport: मोपावर वर्दळ वाढली! आठवड्याला 714 विमानांची ये-जा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

Mopa Airport Traffic: गेल्‍या काही वर्षांत देशभरात जी बारा ग्रीनफिल्‍ड विमानतळे कार्यान्‍वित झाली, त्‍यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर येजा करणाऱ्या विमानांची संख्‍या अधिक आहे.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्‍या काही वर्षांत देशभरात जी बारा ग्रीनफिल्‍ड विमानतळे कार्यान्‍वित झाली, त्‍यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर येजा करणाऱ्या विमानांची संख्‍या अधिक आहे. या विमानतळावर प्रत्‍येक आठवड्याला ७१४ विमानांची येजा होत असल्‍याची माहिती केंद्रीय नागरी विमानोड्डाण राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळासह दुर्गापूर, शिर्डी, पक्‍योंग, कन्‍नूर, कलबुर्गी, ओर्वाकल, चिपी-सिंधुदुर्ग, खुशीनगर, इटानगर, शिवमोगा आणि राजकोट येथील ग्रीनफिल्‍ड विमानतळे गेल्‍या काही वर्षांत सुरू झाली.

या बाराही विमानतळांपैकी मोपा विमानतळावर येजा करणाऱ्या विमानांची संख्‍या सर्वाधिक आहे. या विमानतळावर प्रत्‍येक आठवड्याला ७१४ विमाने येजा करतात, असे मंत्री मोहोळ यांनी नमूद केले आहे. दरम्‍यान, गेल्‍या तीन वर्षांत या विमानतळांनी दहा कोटी प्रवाशी हाताळले असल्‍याचेही मोहोळ यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Mopa Airport
Mopa To London Flight: मोपा ते लंडन विमानसेवेसाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सेवा केली होती बंद

कोणत्‍या विमानतळावर किती विमानांची ये-जा (आठवड्याला)

मोपा ७१४

दुर्गापूर ७६

शिर्डी ८४

पक्‍योंग -

कन्‍नूर २७०

Mopa Airport
Mopa Airport: 'मोपा'वर 11 दारू आउटलेट्स कार्यरत, 80% व्यवसाय गोव्याबाहेरील कंपन्यांच्या ताब्यात

कलबुर्गी १४

ओर्वाकल १८

सिंधुदुर्ग १५

खुशीनगर -

इटानगर ३६

शिवमोगा ४०

राजकोट १३०

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com