मडगाव: मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळीचे अस्तित्व राहाणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना आज वास्को येथे एमपीटीवर झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानांसाठी खुला ठेवण्यात येणार असून दाबोळी विमानतळ देशी विमाने उतरविण्यासाठी वापरला जाईल, असे सांगितले.
(Mopa airport will be kept open for international flights and Daboli airport will be used for domestic flights)
दाबोळी विमानतळ बंद होणार, असे कुणी समजू नये. आम्ही दोन्ही विमानतळ वापरणार आहोत. कुठली विमाने कुठल्या विमानतळावर उतरणार हे ठरविण्यासाठी जीएमआर आणि दाबोळी विमानतळ प्राधिकरण या दोन्ही प्रशासनांची लवकरच बैठक घेऊन त्यांचे वेळापत्रक निश्चित करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
दोन दिवसांपूर्वी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी मोपासारख्या सुविधा दाबोळी विमानतळावर प्रवाशांना मिळाल्या नाहीत तर प्रवासी दाबोळीकडे पाठ फिरवतील आणि कालांतराने दाबोळी विमानतळ बंद करावा लागेल, असे म्हटले होते. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर तुटून पडत दाबोळी बंद करण्याचे हे कारस्थान असल्याचे म्हटले होते.
पुन्हा गोवा माईल्सचा दाबोळीवर काऊंटर
गुदिन्हो यांनी खुलासा करताना आपण केवळ मोपाचे उदाहरण दिले होते. दाबोळी बंद करणार असे म्हटले नव्हते, असे सांगितले. प्रवाशांना दाबोळी विमानतळावर मोपासारख्याच सुविधा मिळण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. टॅक्सीचालकांनी ॲपआधारित पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. ‘दाबोळी’वर गोवा माईल्सचा काऊंटर येत्या दोन दिवसांत सुरू होईल, असेही गुदिन्हो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.