Goa Water Problem: राज्यात काही ठिकाणी पाणीटंचाई कायम; महिला आक्रमक

साबांखा मंत्र्यांची कबुली : दोन प्रकल्पांचे काम सुरू; ‘चांदेल’ची क्षमता वाढवणार
Water Problem
Water ProblemDainik Gomantak

पणजी: नव्याने उभारलेल्या वस्त्या, वाढलेली गावे, हॉटेल्स यांमुळे राज्यातील काही भागांत पाणीटंचाई आहे. मात्र, वाढत्या पाण्याच्या मागणीसाठी अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढवण्याचे काम सुरू असून येत्या काही दिवसांत हे प्रकल्प पूर्णांशाने सुरू होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

(Water shortage continues in some places in Goa state)

Water Problem
Goa News: कला अकादमीच्या नूतनीकरण निर्णयाच्या वादातून गावडे-काब्राल यांच्यात वादाची ठिणगी!

साबांखा मंत्री काब्राल म्हणाले, ‘राज्यात काही ठिकाणी पाणीटंचाई आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. याशिवाय अनेक गावांची रचना व नगर नियोजनाचा अभाव, यामुळे काही भागांमध्ये पाणीटंचाई तीव्रतेने जाणवते. सध्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन सध्या अस्तित्वात असलेल्या चांदेल प्रकल्पाची जलशुद्धीकरणाची क्षमता वाढवून 15 एमएलडीवरून 30 एमएलडी करण्यात येत आहे. पेडणे आणि मांद्रे मतदारसंघाकरिता स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

महिला बनल्या रणरागिणी

येत्या चार दिवसांत नळाला पाणीपुरवठा न केल्यास मोपा - चांदेल रस्त्यावर बसून रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा न्यूवाडा - नागझर येथील महिलांनी पेडणे पाणीपुरवठा खात्याला दिला आहे. पाणी टंचाईच्या निषेधार्थ या महिलांनी आज रस्त्यावर उतरून पाणीपुरवठा विभागाविरुद्ध निदर्शने केली. नागझर - पेडणे येथे गेल्या महिनाभरापासून नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. यामुळे आमचे हाल होत आहेत, असे या महिलांचे म्हणणे आहे.

तुये येथे 30 एमएलडीचा प्रकल्प

पेडणे तालुक्याची पाण्याची मागणी वाढली असल्याने तुये येथे 30 एमएलडी पाणी प्रकल्प उभारण्यात येत असून यासाठी मान्यता मिळाली आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प झाल्यानंतरच पेडणे तालुक्याला पुरेसे पाणी मिळेल. सध्या तालुक्यातील 10 ते 12 गावांना पाणी टंचाई भेडसावत असून पालये, केरी, मांद्रे, मोरजी, तुये, कोरगाव येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे.

Water Problem
Goa Petrol Price: गोव्यातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर

● बार्देश व डिचोली तालुक्यातील काही भागांत बुधवारी मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार, अशी पूर्वसूचना पाणीपुरवठा विभागाने दिली होती. मात्र, त्‍या दिवशी एक थेंबही पाणी लोकांना मिळाले नाही.

● सत्तरीतील वाळपई, वेळूस, कोपार्डे, पाली, ठाणे, हिवरे, गोळावली येथे दोन दिवस नळाला पाणीच आले नाही.

● सांगे, केपे या तालुक्यांत अजूनही जलवाहिनी पोहोचलेली नाही.

मुरगाव तालुक्यात लोकांना दिवसाला फक्त एक तास पाणी मिळणेच त्यांच्या नशिबी आले आहे.

● धारबांदोडा तालुक्‍यात कुळे, दाबाळ, साकोर्डा या पंचायत क्षेत्रात अजूनही जलवाहिनी पोहोचलेली नाही.

● शेट्येवाडा-तोरसे येथे पाणी मिळत नसल्याने लोक आक्रमक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com