Mopa Airport| Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: या भागातील पर्यटन व्यवसाय 50 टक्क्यांनी घटला

यंदा मोपा विमानतळामुळे दक्षिण गोव्याबरोबरच काणकोणमधील पर्यटनाला फटका बसला आहे.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: दोन वर्षे करोना महामारीमुळे राज्याच्या उर्वरित भागाबरोबरोच काणकोणच्या पर्यटनाला चपराक बसली होती. यंदा मोपा विमानतळामुळे दक्षिण गोव्याबरोबरच काणकोणमधील पर्यटनाला फटका बसला आहे.

सध्या काणकोणमधील पर्यटन व्यावसायिकांची सर्व मदार देशी पर्यटकांवर आहे. काणकोणात आगोंद, पाळोळेसारखे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेले किनारे आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय चार्टर विमाने मोपा विमानतळावर उतरू लागल्याने चार्टर व परदेशी पर्यटक काणकोणात अभावानेच येत आहेत.

त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाशी संबंधित हॉटेल व टॅक्सी उद्योगासमोर आव्हान निर्माण झाले आहे. मोपा विमानतळ खुला झाल्यानंतर येथील पर्यटन व्यवसाय पन्नास टक्क्यांनी घटला आहे.

मोपा विमानतळ खुला झाल्यानंतर परदेशी पर्यटकांवर मर्यादा पडली आहे. सध्या काणकोणमधील पर्यटन व्यवसाय देशी पर्यटकांवर विसंबून आहे. मात्र काणकोण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा नसल्याने पुन्हा अडचण निर्माण झाली आहे.

काणकोणमधील पर्यटन व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी काणकोण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा देणे गरजेचे आहे. - संदेश तेलेकर, ‘अाप’चे पदाधिकारी

काणकोणमधील पर्यटन व्यवसाय अनेक प्रशासकीय समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. पर्यटन व्यवसायाला परवानगी मिळविण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याची नितांत गरज आहे.

आवश्यक परवाने मिळविण्यासाठी व्यावसायिकांना आपला व्यवसाय सोडून वेगवेगळ्या खात्यात हेलपाटे मारावे लागतात, हे कोठे तरी थांबायला हवे. - पंकज नाईक गावकर, खासगी जमिनीतील शॅक ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT