Colavle Industrial Estate : कोलवाळ औद्योगिक वसाहतीत कामगारांची निर्दशने!

कोलवाळ औद्योगिक वसाहतीमधील कंपनीने 20 कामगारांची बदली महाराष्ट्रातील युनिटमध्ये केली, याला विरोध करत कर्मचारी वर्गाने कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने केली.
Colavle Industrial Estate | Workers Protest
Colavle Industrial Estate | Workers ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

Workers Protest in Colavle Industrial Estate: कोलवाळ औद्योगिक वसाहतीमधील ‘ग्लेनमार्क कंपनी’ने 20 कामगारांची कथित तडाफडकी बदली नाशिक-महाराष्ट्रातील युनिटमध्ये केली. या निर्णयाच्या निषेधार्थ बुधवारी (ता.25) सायंकाळी कर्मचारी वर्गाने कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने केली.

कर्मचारी संघटनेची स्थापना केल्यानेच सदर कंपनीच्या व्यवस्थापनाने वरील कारवाई केल्याचा आरोप या आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला.

कंपनीत सुमारे 13 वर्षे काम केलेल्या कामगारांनी एकत्रित येऊन एका कामगार संघटनेची स्थापना केली. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने 20 कामगारांच्या या तडकाफडकी बदल्या केल्या.

मात्र कर्मचाऱ्यांच्या सदर बदल्या रद्द कराव्यात या मागणीसाठी आज कामगारांनी ग्लेनमार्क कंपनीच्या फाटकासमोर ही निदर्शने केली. तसेच कंपनीच्या कथित धोरणा विरोधात घोषणाबाजी केल्या.

Colavle Industrial Estate | Workers Protest
Goa Government: सोनारबाग बंधारा बांधण्यासाठी सरकारकडून दबावतंत्र - आरजी नेते मनोज परब

या आंदोलनाचे असंघटित कामगार महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाजी धुमाळ यांनी नेतृत्व केले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कंपनीच्या व्यवस्थापनाने पोलिसांना पाचारण केलेले.

कोलवाळ पोलिसांनी आंदोलक कामगारांच्या नेत्यांशी बोलणी केली व हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. तर आंदोलक कामगारांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करूनच निर्दशने केल्याचा दावा केला.

Colavle Industrial Estate | Workers Protest
Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेतर्फे मालमत्ता पुनर्मूल्यांकन

ग्लेनमार्क कंपनीचे अधिकारी ओमकार परब यांनी चर्चा करून कामगारांच्या दोन नेत्यांना व्यवस्थापनाकडे बोलण्यास संधी दिली जाईल, असे सांगितले.

मात्र व्यवस्थापनाने कामगारांना भेटण्यास नकार दिले. कंपनीच्या कायद्याप्रमाणे कंपनी आपल्या कामगारांची कंपनीच्या कोणत्याही शाखेत बदली करू शकते, त्यात गैर काही नाही, असे या कंपनीच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com