Goa Environment: तळे कोरडे पडल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक

नैसर्गिक तळे आटल्याने डिचोली तालुक्यातील कुडचिरे गावातील शेती धोक्यात आली आहे.
Goa Environment |Farm Land
Goa Environment |Farm LandDainik Gomantak

Ponds In Goa Drying up: नैसर्गिक तळे आटल्याने डिचोली तालुक्यातील कुडचिरे गावातील शेती धोक्यात आली आहे. भटवाडी येथे असलेल्या या तळ्याचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी तसेच गावातील शेतीव्यवसायाला पुनर्जीवित करण्यासाठी या तळ्याचा विकास करावा, अशी मागणी गावातील शेतकरी करीत आहेत.

एकेकाळी याच तळ्यातील पाण्यावर गावातील जवळपास दीडशे शेतकरी शेती फुलवत होते. मात्र, हे तळे कोरडे पडल्यापासून शेती करण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

पाण्याअभावी गेल्या जवळपास बारा वर्षांपासून गावातील भटवाडी परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पडीक आहे.

दुसऱ्या बाजूने गावातील विहिरीवरही परिणाम जाणवत आहे. भटवाडी परिसरातील मोठा आवाका असलेले हे तळे आता पूर्ण कोरडे पडले असून, त्या ठिकाणी तळे आहे, याची जाणीव होत नाही.

देखभालीकडे दुर्लक्ष

भटवाडी येथील या तळ्यातील पाणी पंपद्वारे सत्तरी तालुक्यात येणाऱ्या पडोसेपर्यंत नेण्यात येत होते. त्यामुळे या तळ्यातील जलसाठा सुरक्षित राहावा म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जलस्रोत खात्यातर्फे उपाययोजना करण्यात येत होती.

मात्र, पडोसेपर्यंत पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर या तळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. आता हळूहळू तळ्याच्या कडा कोसळून त्याची दुर्दशा होत आहे.

Goa Environment |Farm Land
Goa Government: सोनारबाग बंधारा बांधण्यासाठी सरकारकडून दबावतंत्र - आरजी नेते मनोज परब

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याकडून पाहणी

भटवाडीतील तळ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अलीकडेच या भागाचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या तळ्याची पाहणी करून सद्यस्थिती जाणून घेतली आहे.

आमदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, जलस्रोत खात्याकडून या तळ्याचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच प्रियंवदा गावकर आणि अन्य पंचसदस्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com