Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळावर विमान सेवा सुरू; अडथळा टाळण्यासाठी वाहतुकीवर नियंत्रणाचे आदेश

रस्त्यावर वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याचे सक्त निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सेवा गुरुवार दि. 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे. विमानसेवेसाठी प्रवाशांना ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू होणार आहे.

वाहनांची व्यवस्था तसेच रस्त्यावर अपघात होऊ नये, वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी सुकेकुळण ते मोपापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मंगळवारी (ता. 3) रस्ता विभागाचे प्रधान अभियंते आत्माराम गावडे तसेच पेडणे तालुका रस्ता विभागाचे अभियंते लक्ष्मण नाईक यांच्यासोबत केली.

यावेळी वारखंड-नागझरच्या सरपंच गौरी जोसलकर, पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत, मोपा पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, मोपा वाहतूक पोलीस निरीक्षक महेश केरकर, पेडणे वाहतूक पोलीस निरीक्षक विश्वजीत तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

अपघात होण्याची ज्या ठिकाणी शक्यता आहे त्या ठिकाणी रंब्बल घालण्याच्या सूचना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिल्या. पेडणे तालुक्यात या मार्गावर भविष्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होणार आहे. त्यावर सरकारी यंत्रणेने नियंत्रण ठेवून वेळोवेळी लक्ष ठेवावे, असेही आमदार आर्लेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या रस्त्याच्या बाजूला घरे असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे त्याठिकाणी दिशादर्शक फलक खास रंब्बल घालावे, अशा सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना केली.

सुकेकुळण ते मोपा पठारपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून हा रस्ता नव्यानेच राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याचे सक्त निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT