Monsoon Withdrawal Dainik Gomantak
गोवा

Monsoon Withdrawal: अच्छा तो हम चलते हैं! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट

Monsoon Withdrawal 2025: गोव्यात १६, १७ आणि १८ सप्टेंबर या तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

Pramod Yadav

पणजी: गेल्या साडे तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या मान्सूनने अखेर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याची माहिती दिलीय. यावर्षी निश्चित मुदतीच्या अगोदरच मान्सून गोव्यासह महाराष्ट्रात दाखल झाला होता. गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात तीन दिवस यलो अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

गोव्यात यलो अलर्ट

हवामान खात्याचे गोवा वेधशाळेने राज्यात आजपासून (१६ सप्टेंबर) तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात १६, १७ आणि १८ तारखेला मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. याकाळात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यात देखील वर्तविण्यात आली आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात कुठे किती पाऊस झाला?

गेल्या चोवीस तासांत राज्यात साखळीत सर्वाधित ५६. मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखल पेडणे येथे ४३.८ मिमी, धारबांदोडा येथे ४३.४, फोंडा येथए ४३ आणि ओल्ड गोवा येथे ३१.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर, दाबोळीत सर्वात कमी ४.८ मिमी पावसाची नोंद झालीय.

महाराष्ट्रात मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात बीड, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड, पुणे, आहिल्यानगरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

मान्सूनची माघार कशी होते?

मान्सूनचा परतीचा प्रवास हा एक लांबचा प्रवास असतो. परतीच्या प्रवासात मान्सून राजस्थानपासून दक्षिण भारत आणि ईशान्येकडे प्रवास करतो. वाऱ्यांची दिशा बदलू लागते आणि आर्द्रता कमी होते, तेव्हा नैऋत्य मान्सून माघार घेण्याची तयारी करत आहे, असे समजले जाते.

मान्सूनची माघारी जातो म्हणजे केवळ पाऊस थांबतो असे नाही, तर ते हवामानातील मोठ्या बदलाचे लक्षणही आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, मान्सून संपूर्ण देशातून माघार घेतो. आणि ईशान्येकडील वारे नैऋत्य वाऱ्यांची जागा घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT