Budh Mangal Yog: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुध-मंगळाचा ‘दशांक योग’! 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; अफाट धनलाभासोबत सुरु होणार सुवर्णकाळ

Dashank Yog 2026: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनी अंतराळात एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ खगोलीय घटना घडणार आहे.
Dashank Yog 2026
Budh Mangal YogDainik Gomantak
Published on
Updated on

Dashank Yog 2026: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्टला दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनी अंतराळात एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ खगोलीय घटना घडणार आहे. अनेक वर्षांनंतर बुध आणि मंगळ ग्रह एकत्र येऊन ‘दशांक योग’ निर्माण करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कोणतेही दोन ग्रह एकमेकांपासून नेमके 36 अंशांच्या अंतरावर येतात, तेव्हा या शुभ कोणीय योगाची निर्मिती होते.

ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि 27 नक्षात्रांनी बनलेल्या संपूर्ण आकाशमंडळाला ‘भचक्र’ म्हटले जाते, ज्याचा एकूण विस्तार 360 अंश असतो. या 360 अंशांचा दहावा भाग म्हणजेच 36 अंश, म्हणून याला 'दशांक योग' असे नाव देण्यात आले. ज्योतिषाचार्य हर्षवर्धन शांडिल्य यांच्या मते, बुध हा ग्रहांचा राजकुमार आहे आणि मंगळ हा ग्रहांचा सेनापती आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वपूर्ण ग्रहांच्या संयोगाला 'राजकुमार-सेनापतीची गुप्त मंत्रणा' असेही म्हटले जाते. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर होणार असला, तरी 5 राशींसाठी हा काळ धन आणि गेलेला मान-सन्मान परत मिळवून देणारा ठरेल.

Dashank Yog 2026
Horoscope: गुरुवारचा दिवस ठरणार लकी! 'या' राशींवर बरसेल लक्ष्मीची कृपा, रखडलेली कामं मार्गी लागून नोकरीत मिळेल मोठं यश

या शुभ योगामुळे मेष राशीच्या जातकांच्या करिअरमध्ये वेगाने हालचाली होतील. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता असून, जुने रखडलेले व्यवहार पुन्हा मार्गी लागतील. जुने अडकलेले पैसे परत मिळतील आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश लाभेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग जनसंपर्क आणि आर्थिक बाबतीत अत्यंत फायदेशीर ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कौशल्याची दखल घेतील आणि जुन्या ओळखींमधून उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक जीवनात तुमच्या सल्ल्याला विशेष मान दिला जाईल.

Dashank Yog 2026
Horoscope 12 August 2026: बुधवार ठरणार अत्यंत महत्त्वाचा! 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; लागणार बंपर जॅकपॉट

कन्या राशीच्या जातकांसाठी बुध-मंगळाचा हा योग करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी निर्माण करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची विश्लेषणात्मक विचारसरणी कठीण कामेही सोपी करेल, ज्यामुळे भविष्यात पदोन्नतीचे (Promotion) मार्ग मोकळे होतील. व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील आणि पैशांशी संबंधित प्रलंबित निर्णय मार्गी लागतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ जुन्या मेहनतीचे फळ देणारा ठरेल. दीर्घकाळापासून रेंगाळलेली कामे गती पकडतील आणि नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळतील. कायदेशीर किंवा कागदपत्रांच्या वादातून मोठी सुटका होईल.

Dashank Yog 2026
Horoscope: श्रावणाची सुरुवात ठरणार अत्यंत शुभ! 'या' राशींच्या लोकांना भाग्याची साथ, करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे संकेत

तसेच, कुंभ राशीच्या जातकांना या योगामुळे आपली नवीन विचारसरणी पैशात बदलण्याची सुवर्णसंधी मिळेल. विशेषतः डिजिटल क्षेत्र, तंत्रज्ञान आणि ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्यांना अफाट नफा होईल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत सुरु करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील, मात्र कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम पत्करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com