Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Bison In Narvem: पावसाळी भाज्यांचे मळे बहरत असतानाच नार्वेच्या दिवगाळी भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून गव्यांचा उपद्रव वाढला आहे.
Bison In Narvem
Bison In GoaDainik gomantak
Published on
Updated on

डिचोली: पावसाळी भाज्यांचे मळे बहरत असतानाच नार्वेच्या दिवगाळी भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून गव्यांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी गवे मळ्यांत घुसून भाजी पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना रात्री जागरण करावे लागत आहे.

यंदा असंतुलित पावसामुळे भाजी लागवड उशिरा झाली. उशिराने का होईना, मळे बहरले असून भेंडी, काकडी, दोडकी आदी भाज्यांचे पीक फुलू लागले आहे. मात्र, ऐन कमाईच्या वेळी गव्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Bison In Narvem
Goa Tree Plantation: गोव्यात हरितक्रांतीला वेग! जून-जुलैमध्ये 18,469 रोपांची लागवड; पाणथळ जागा, शाळा, पंचायत क्षेत्र, महामार्गांच्या परिसरात वृक्षारोपण

सदानंद चोडणकर, गीतांजली गावडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या मळ्यांत गवे घुसल्याच्या पावलांच्या खुणा आढळल्या आहेत. गव्यांनी विशेषतः काकडी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Bison In Narvem
Goa Karnataka Water Dispute: म्हादईनंतर आता तिळारीच्या पाण्यावरही कर्नाटकाची नजर; गोव्याच्या जलहक्कांसमोर नवे संकट, सत्ताधारी-विरोधक मात्र शांतच!

दहा वर्षांपूर्वी नार्वेत गव्यांचा उपद्रव वाढला होता. त्यानंतर दीर्घकाळ गव्यांचा वावर जाणवला नव्हता. आता पुन्हा उपद्रव सुरू झाल्याने भाजी पिके धोक्यात आली आहेत. नुकसान टाळण्यासाठी वन खात्याने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com