Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

America Double Murder Case: 17 वर्षीय उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलाने स्वतःच्याच आईची आणि 14 वर्षांच्या लहान भावाची निर्घुण हत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली.
America Double Murder Case
America Double Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

America Double Murder Case: अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यामध्ये एका भारतीय वंशाच्या 17 वर्षीय उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलाने स्वतःच्याच आईची आणि 14 वर्षांच्या लहान भावाची निर्घुण हत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. अर्जुन अरविंद असे या आरोपी अल्पवयीन मुलाचे नाव असून तो ॲक्टन शहरात आपल्या कुटुंबासह राहत होता.

मंगळवारी घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपीने आईची कार घेऊन पळ काढला होता, मात्र पोलिसांनी रात्रभर राबवलेल्या शोधमोहीमेनंतर बुधवारी पहाटे त्याला वेलँड परिसरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर हत्येच्या दोन गंभीर गुन्ह्यांसह चोरी आणि जीवघेण्या हल्ल्याचे अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

America Double Murder Case
America Iran News: 'अमेरिकेची हवा निघाली'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'नो वॉर'च्या घोषणेवर इराणचा तगडा पलटवार VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय सुधा व्यंकटेशन आणि त्यांचा 14 वर्षांचा मुलगा सिद्धार्थ अरविंद अशी हत्या झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. बोस्टनपासून सुमारे 48 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या 'मार्था लेन' येथील घरात हे हत्याकांड घडले. मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जेव्हा मुलांचे शिकवणी शिक्षक नेहमीप्रमाणे घरी पोहोचले, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी अर्जुनच्या वडिलांशी संपर्क साधला.

वडिलांनी घरात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना (Police) तपासासाठी पाठवले. पोलिसांनी घरात प्रवेश केला असता तळघरात आईचा मृतदेह, तर पहिल्या मजल्यावर लहान भावाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. दोघांच्याही शरीरावर गंभीर जखमा होत्या.

America Double Murder Case
America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक अत्यंत भयानक आणि खळबळजनक माहिती समोर आली. 'मिडलसेक्स काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी' कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन गेल्या काही दिवसांपासून अत्यंत विचित्र आणि चिंताजनक वर्तन करत होता. त्याने इंटरनेट आणि 'चॅटजीपीटी' या एआय चॅटबॉट्सचा वापर करुन आपल्या स्वतःच्याच कुटुंबाला मारण्याच्या काल्पनिक कल्पनांचा शोध घेतला होता. गॉथिक कादंबरीच्या शैलीत कथा रचण्यासाठी तो चॅटजीपीटीला विविध प्रश्न विचारत होता. या क्रूर कृत्यानंतर आरोपीला लोवेल ज्युवेनाईल कोर्टात आणि त्यानंतर पुढील सुनावणीसाठी कॉनकॉर्ड डिस्ट्रिक्ट कोर्टात हजर केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com