Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon Update: केरळात मॉन्सून 4 जूनपर्यंत; 8 जूनला गोव्यात बरसणार सरी

एल-निनोच्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सून पावसाविषयी चर्चा सुरू असतानाच, नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा तीन दिवस उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

एल-निनोच्या सावटामुळे यंदाच्या मॉन्सून पावसाविषयी चर्चा सुरू असतानाच, नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यंदा तीन दिवस उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. देशाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळमध्ये ४ जून रोजी मॉन्सून पोहोचण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. तर त्यानंतर चार दिवसांनी (८ जूनला) गोव्यात धडकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून एक जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. यात मॉन्सूनचे आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होऊ शकते. गतवर्षी मॉन्सूनचे आगमन तीन दिवस आधी म्हणजेच २९ मे रोजी झाले होते. यंदा तो तीन दिवस उशिराने केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे.

यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ११ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे.

मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामातील पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे. भारतात आतापर्यंत मॉन्सूनपूर्व हंगामात २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे, तर मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा २६८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

दोन दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता

केरळमध्‍ये दाखल झाल्‍यानंतर मॉन्‍सून ४ दिवसांत गोव्‍यात पोहोचतो, असा अनुभव आहे. त्‍यानुसार ८ जूननंतर तो राज्‍यात बरसेल, अशी शक्‍यता आहे. गोवा वेधशाळेने त्‍याबाबत अद्याप ठोस अंदाज वर्तवलेला नाही. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस म्हणजेच राज्यातील कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून वातावरणातील आर्द्रता वाढणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविली आहे.

९६ टक्केच बरसणार; हवामान विभाग

वर्ष आगमनाचा अंदाज प्रत्यक्ष आगमन

२०१८ २९ मे २९ मे

२०१९ ६ जून ८ जून

२०२० ५ जून १ जून

२०२१ ३१ मे ३ जून

२०२२ २७ मे २९ मे

मॉन्सून लांबणार; स्कायमेटचा अंदाज

मॉन्सून अंदमानमध्ये साधारणत: २२ मे रोजी दाखल होत असतो. मात्र, यंदा त्याची सुरवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मॉन्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटच्या शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. हवामानाची माहिती देणारी खासगी संस्था स्कायमेट वेदर संस्थेने तळकोकण व गोवा भागात ८ ते ९ जून दरम्यान मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Goa Live Updates: उपसरपंच सुषमा नागवेकर यांच्यासह तीन पंचायती सदस्य चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये

SCROLL FOR NEXT