Monsoon Date Dainik Gomantak
गोवा

Monsoon Arrival: मान्सूनची सुखद चाहूल! २७ मे रोजी आगमन शक्य; गोव्यात कोसळणार हलक्या सरी

Monsoon Season: केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच २७ मे रोजी मान्सून दाखल होण्याची सुवार्ता हवामान विभागाने दिली आहे.

Sameer Panditrao

पुणे: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) आगमनाचा प्रवास यंदा वेळेआधी होण्याचे संकेत आहेत. मंगळवारपर्यंत (ता. १३) मान्सून अंदमान-निकोबार बेटसमूहावर दाखल होण्यासाठी पोषक हवामान आहे. केरळमध्ये यंदा पाच दिवस अगोदर म्हणजेच २७ मे रोजी मान्सून दाखल होण्याची सुवार्ता हवामान विभागाने दिली आहे. मान्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही वर्तविली आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये पोचतो. मान्सूनचे केरळमधील आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होण्याची शक्यता असते. पूर्व केंद्रीय अरबी समुद्रातून पश्चिम-उत्तर मध्य प्रदेशाकडे, उत्तरेकडील कोकण पासून कर्नाटक आणि तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून काही अंतरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

त्याच्या प्रभावातून राज्यातील काही भागांत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविली आहे. आज राज्यात कमाल ३५.२ तर किमान २६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. सरासरी तापमानाच्या तुलनेत कमाल तापमानात एका अंशांनी अधिक होते; परंतु आज काही प्रमाणात आर्द्रतेत घट झाल्याने उष्म्याचा प्रभाव काही काळासाठी मंदावला होता.

मान्सूनचे आगमन २७ मे रोजी शक्य

नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमान समुद्रात दाखल होण्यास पोषक स्थिती आहे. उद्यापर्यंत (ता. १३) अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर मान्सूनची चाल वेगाने होण्याचे संकेत असल्याने चार ते पाच दिवसांतच मोसमी वारे संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत धडकण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT