Monsoon Arrival: मान्सून होणार वेळेआधी दाखल! हवामान विभागाची मोठी अपडेट; तारखा जाणून घ्या..

Monsoon 2025 Update: नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) आगमनाचा सांगावा आला आहे. अंदमान-निकोबार बेट समूहावर मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.
Monsoon Update
Monsoon NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) आगमनाचा सांगावा आला आहे. अंदमान-निकोबार बेट समूहावर मान्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १३) मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांवर दखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मान्सूनचे अंदमानात वेळेआधी दाखल होण्याचे संकेत असल्याने केरळातील लवकर आगमनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मान्सून साधारणतः २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो.

Fengal Cyclone Goa Rain
Goa RainDainik Gomantak

तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो. यंदा १३ मे रोजी मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी डेरे दाखल झालेला मॉन्सून ६ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पोहोचला होता.

Monsoon Update
Monsoon 2025: यंदा दणकून ‘कोसळ’धार! गोव्यात बरसणार मुसळधार सरी; हवामान विभागाची शुभवार्ता

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Monsoon Update
Unseasonal Rain: नेत्रावळीत ‘अवकाळी’चे धुमशान सुरूच! अनेक झाडांची पडझड; बागायतदारांना फटका, भातशेतीचेही नुकसान

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरी वर असून, सध्या तटस्थ स्थिती म्हणजेच ‘ला-निना’ नाही, आणि ‘एल-निनो’ नाही अशी स्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com