Monsoon Arrival Canva
गोवा

Monsoon 2025: ..नभ उतरू आलं! अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल; 5 दिवस आधीच आगमन

Monsoon Arrival: निकोबार बेटांवर गेल्या चोवीस तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. यातच पुढील दोन दिवस हा पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज आहे.

Sameer Panditrao

पुणे: नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) मंगळवारी अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील प्रवास वेगाने होत मॉन्सून यंदा २७ मेपर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत आहेत.

निकोबार बेटांवर गेल्या चोवीस तासांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. यातच पुढील दोन दिवस हा पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह वाढले आहेत.

या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत २० नॉट्स वेगाने पश्‍चिमी वारे वाहत आहे. अंदमान समुद्रात काही ठिकाणी ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिमी वाऱ्यांचे प्रवाह दिसून येत आहे.

त्याचबरोबर आकाशात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, ढगांची दाटी आणि पावसाच्या हजेरीने मॉन्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, तसेच दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन भागापर्यंत मॉन्सून धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो.

Monsoon Date

यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला.

महाराष्ट्र राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

पाच दिवस आधीच आगमन

यंदा मॉन्सूनचे तब्बल पाच दिवस आधीच आगमन झाले आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर केरळमध्ये दोन दिवस आधीच म्हणजेच ३० मे रोजी मॉन्सूनने धडक दिली होती. ६ जून रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी वाऱ्यांनी हजेरी लावली होती.

आधीचे आगमन

वर्ष तारीख

२०२१ २१ मे

२०२२ १६ मे

२०२३ १९ मे

२०२४ १९ मे

२०२५ १३ मे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खराब रस्ते, दूषित पाणी अन् बेरोजगारी; केपेतील नागरिकांनी आपच्या नेत्यांसमोर मांडल्या समस्या

Budh Gochar 2026: नोकरी-व्यवसायात प्रगती आणि धनलाभ! 2 डिसेंबरपासून 5 राशींचे चमकणार नशीब; आयुष्यात येणार आनंदाचे क्षण

ST Reservation: प्रियोळमध्ये एसटी आरक्षणाला विरोध; 3 हजार मतदारांच्या सह्यांसह राज्यपालांना निवेदन

ABVP Goa University Election: गोवा विद्यापीठात अभाविपचा क्लीन स्वीप; सर्व 9 जागांवर विजय, एनएसयूआयचा धुव्वा

Viral Post: हद्दच झाली राव! नोकरीसाठी अर्जच केला नाही, पण कंपनीकडून आला थेट 'रिजेक्शन मेल'; जॉब मार्केटची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

SCROLL FOR NEXT