vaccination certificate Dainik gomantak
गोवा

..म्हणून निवडणूक आयोग मोदींचा लसीकरण प्रमाणपत्रावरचा हटणार फोटो

लस प्रमाणपत्रातून मोदींचा फोटो वगळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय को-विन प्लॅटफॉर्मवर आवश्यक फिल्टर लागू करेल

दैनिक गोमन्तक

मतदानाच्‍या पाच राज्‍यांमध्‍ये जारी करण्‍यात आलेल्‍या कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसेल कारण आचारसंहिता लागू झाली आहे, असे अधिकृत सूत्रांनी दिली आहे. लस प्रमाणपत्रातून मोदींचा फोटो वगळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय को-विन प्लॅटफॉर्मवर आवश्यक फिल्टर लागू करेल, असे सूत्राने सांगितले.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly elections) 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा निवडणूक (Election) आयोगाने शनिवारी केली.

वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सरकार, उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. "आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे या पाच राज्यांमध्ये लोकांना दिल्या जाणाऱ्या COVID-19 प्रमाणपत्रांमधून पंतप्रधानांचे चित्र वगळण्यासाठी आरोग्य मंत्रालय CoWIN प्लॅटफॉर्मवर आवश्यक फिल्टर लागू करेल."

मार्च 2021 मध्ये, काही राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) सुचविल्यानुसार आरोग्य मंत्रालयाने आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी येथे झालेल्या मतदानादरम्यान असाच पुढाकार घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT