Congress Press Conference Dainik Gomantak
गोवा

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे: पृथ्वीराज चव्हाण

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजप सरकारला कडाडून लक्ष्य करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगितले की, भाजपचा घटक महागाई, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास आहे आणि आता भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. चव्हाण यांनी सोमवारी पणजीत पत्रकार परिषद घेवून महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करा, असे सांगितले.

गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनिल कवठणकर आणि नौशाद चौधरी यावेळी उपस्थित होते.यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिका लोकार्पण केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की नोटबंदी, तसेच वस्तू आणि सेवाकर लागू करणे हे मोदी सरकारची मोठी चूक होती ‘‘सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. पण मोदी सरकार ती फुगवून दाखवत आहे.’’ असे ते म्हणाले. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि स्थिती खुपच गंभिर आहे. यासाठी लोकांनी भाजप सरकारला घरी पाठवण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोदी कसे आकडे दाखवतात त्याच्यावर देशातील लोकांची नजर आहे असे ते म्हणाले.

“मला पुर्ण खात्री आहे की काँग्रेसला बहुमत मिळणार आणि आम्ही स्थिर सरकार देणार. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार नाही.’’ असे ते म्हणाले.

“मोदी सरकारने महागाई वाढवून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भावनांशी खेळ केला आहे. लोकांना त्रास केला आहे. असे असताना, त्याच्या भांडवलदार मित्रांचे उत्पन्न दिवसेंदिवस हजारो कोटींनी वाढत आहे.” असे चव्हाण म्हणाले.

“मोदी सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. याचा परिणाम बाजारावर झाला आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. पण मोदीजी अनेक करांच्या लुटलेल्या पैशातून पेट्रोल पंपावर आणि वर्तमानपत्रात आपल्या जाहिराती दाखवण्यात व्यस्त आहेत.’’ असे त्यांनी नजरेस आणले.

त्यांनी माहिती दिली की मोदी सरकारने (Modi Government) गेल्या सात वर्षात पेट्रोल आणि डिझेल (अबकारी कर) मधून वसूल केलेल्या करातून 24 लाख कोटींची लूट केली आहे.

ते म्हणाले की, एलजीपी गॅसपासून स्वयंपाकघरातील सर्व आवश्यक वस्तू वाढल्या आहेत. "आता एलपीजीची किंमत जवळपास 1000 रुपये आहे. खाद्यतेल आणि डाळ 200 रुपयांच्या वर गेली आहे." असे चव्हाण म्हणाले.

महागाईचे उदाहरण देत ते म्हणाले की, प्रति किलो चहाच्या पाकिटांची किंमत २2014 साली 130 ते 140 रुपये होती, जी आता 400 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

ते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 108 डॉलर होती, तरीही काँग्रेस सरकार कमी किमतीत पेट्रोल देण्यात यशस्वी झाले. “आता कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 73 डॉलरवर आले आहेत, परंतु सरकारने पेट्रोलचे दर कमी केले नाहीत. यावरून भाजप सरकार देशातील जनतेची लूट करत असल्याचे सिद्ध होते.’’ असे ते म्हणाले.

"गोव्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 100 रुपयांवर पोहोचले आहेत. काँग्रेस (Congress) सत्तेवर आल्यानंतर हे दर कमी करू, असे आश्वासन आम्ही देतो, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात खाद्यतेल आणि इतर वस्तूंचे दर तीन ते चार पटीने महागले आहेत. “दररोज 220 ते 250 लाख लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. 2013-14 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात प्रति प्रवासी रेल्वे भाडे 32 पैसे प्रति किलोमीटर होते. भाजप सरकारच्या कार्यकाळात, 2020-21 मध्ये, प्रति प्रवासी प्रति किलोमीटर ₹1.10 पैसे झाले, म्हणजेच 343 टक्के वाढ झाली आहे.’’ असे ते म्हणाले.

केंद्रातील भाजप (BJP) सरकारने कपडे, वस्त्रे इत्यादी तयार वस्तूंवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे ते अधिक महाग होतील, असे ते म्हणाले. "कर वाढल्यामुळे पादत्राणे, अन्न वितरण सेवा आणि क्लाउड किचन, एफएमसीजी उत्पादनांच्या किमतीही वाढतील."असे ते म्हणाले.

"मोदी सरकारने ऑनलाइन व्यवहारांना चालना दिली, परंतु आता एटीएममधून स्वतःचे पैसे काढण्यासाठी आम्हाला कर भरावा लागेल." अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भाजप आणि महागाई देशासाठी घातक आहे, त्यामुळे त्यांना एकजुटीने पराभूत केले पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.

दिनेश गुंडू राव म्हणाले की, भाजप शासित राज्ये लोकांची लूट करत आहेत, त्यामुळे त्यांना घरी पाठवले पाहिजे. अलका लांबा यांनीही वाढत्या किमतीवरून भाजप सरकारवर टिका केली.‘‘ही महागाईची परिस्थिती मोदीने तयार केली आहे आणि यासाठी काँग्रेस सरकार सत्तेवर येण्याची गरज आहे.’’ असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT