गोवा: गोवा तृणमूल सह-प्रभारी सुष्मिता देव यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल आमित शहा गोवा दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी गोवा TMC वर अनेक आरोप करत बाहेरचे पक्ष गोव्यात येऊन इथ सत्ता स्थापन करू पाहत आहेत, तसेच राज्यात TMC ची एकही सीट येणार नाही असा टोला लगावला याला उत्तर देताना सुश्मिता देव म्हणाल्या. (Sushmita Dev got angry over union home minister Amit Shah statement)
बेटी बचाओ बेटी पढाओ हा भाजपचा (Goa BJP) नारा आहे तर, अमित शहा काल गोव्यात आले होते प्रचारादरम्यान ते राज्यात वाढणाऱ्या बलात्कार प्रकरणावर का काही बोलले नाहीत, राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर ते का काही बोलले नाहीत. सध्या देशात जितके बलात्कार होतात त्याच्या दुप्पट बलात्कार राज्यात होतात या मुद्द्यावर ते का काही बोलले नाहीत असे प्रश्न उपस्थित करत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी इलेक्शन जाहीर व्हायच्या आधी 30,000 नोकऱ्यांची घोषणा केली, याआधी पाच वर्ष मुख्यमंत्री काय करत होते याचे उत्तर त्यांनी देणे गरजेचे आहे असा टोला त्यांनी प्रमोद सावंत यांना लगावला.
एकीकडे तुम्ही भारताची एकी सातत्याने भाषणातून बोलून दाखवता आणि गोव्यात येऊन तुम्ही एका नॅशनल पक्षाला बाहेरचा पक्ष का म्हणता याचा जाब त्यांनी अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना विचारला. तसेच, आम्हाला बाहेरचं म्हणण्या आधी त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) हे गुजरातचे आहेत, तेव्हा हा आरोप कोणी केला नव्हता की गुजरातचे मुख्यमंत्री येऊन देशाचे पंतप्रधान झाले. लोकतंत्रने आम्हाला दिलेला हा अधिकार आहे. असे म्हणत त्यांनी भाजपला उघड आव्हान दिले कि या निवडणुकीत भाजप सरकार निवडून येणार नाही कारण भाजपने वेळोवेळी नागरिकांचा विश्वास घातच केलेला आहे. दरम्यान बंगालमधला तो क्षण तुम्ही विसरू नका तृणमूल काँग्रेस काय आहे हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तो इतिहास तुम्ही विसरू नका असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत महिला विंग अध्यक्षा श्रीमती अविता बांदोडकर यांचीही उपस्थिती होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.