Saint Francis Xaviers Feast  Dainik Gomantak
गोवा

ओल्ड गोव्यात St. Francis Xaviers Feast च्या पार्श्वभूमीवर पार पडली मॉक ड्रिल; जगभरातील नागरिक देतात भेट

25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात होणार फीस्ट

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa St. Francis Xaviers Feast: ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च परिसरात होणाऱ्या St. Francis Xaviers Feast च्या पार्श्वभुमीवर येथे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून येथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

ही फीस्ट 25 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात होणार आहे. या काळात सेंट फ्रान्सिस झेवियर यांची प्रार्थना करण्यासाठी जगभरातून हजारो लोक ओल्ड गोव्यात येतात. त्यांचे अवशेष या चर्चमध्ये जतन केले गेले आहेत.

गोवा पोलीस आणि राज्यातील इतर सुरक्षा एजन्सीजमार्फत या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. हा सेंट फ्रान्सिस झेवियर्सचा उत्सव ओल्ड गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च परिसरात साजरा होतो.

बुधवारी ही मॉक ड्रिल पार पडली. पोलिसांनी दोन डमी दहशतवाद्यांना पकडले आणि बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्चजवळ दोन्ही डमी बॉम्ब निष्फळ केले.

मॉक एक्सरसाइजचा एक भाग म्हणून पर्यटक आणि भाविकांसह सुमारे 800 लोकांना कोणतीही भीती न बाळगता सात मिनिटांत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कवायत 22 मिनिटांत संपली, असे पोलिसांनी सांगितले.

उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निधिन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉक ड्रिल झाली.

या सरावात जुने गोवा पोलीस, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोध आणि निकामी पथक, श्वान पथक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा आणि आरोग्य विभाग सहभागी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT