Motoverse: गोव्यातील 'मोटोव्हर्स'मध्ये सहभागी होणार 15000 रॉयल एनफिल्ड रायडर्स

13व्या पर्वाला 24 नोव्हेंबरपासून होणार प्रारंभ
Royal Enfield Motoverse 2023
Royal Enfield Motoverse 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Royal Enfield Motoverse 2023: मोटारसायकल, संगीत आणि कला यांचा संगम असलेल्या रॉयल एनफिल्डच्या मोटोव्हर्सच्या 13 व्या पर्वाला गोव्यातील वागातोर येथे 24 नोव्हेंबर रोजी सुरूवात होत आहे. यात रॉयल एन्फिल्डचे सुमारे पंधरा हजार एन्थुझियास्ट सहभागी होणार आहेत, असे कळते.

तीन दिवस हा महोत्सव असणार आहे. या फेस्टला पुर्वी रायडर मॅनिया म्हणून ओळखले जात होते. रॉयल एनफिल्ड रायडर्सचा हा जगातील सर्वात मोठा मेळावा असेल, असे बोलले जात आहे.

या वर्षी, मोटोव्हर्समध्ये डर्ट ट्रॅक, स्लाईड स्कूल आणि ट्रेल स्कूल यांसारखे अनेक उपक्रम होतील. याशिवाय साहसी आणि प्रेरणादायी कथा, उत्तम खाद्यपदार्थ आणि फंकी कस्टम-बिल्ट मोटरसायकलही असतील.

रॉयल एनफिल्डच्या मोटोवर्सचे उद्दिष्ट एक मध्यवर्ती हब आणि समाजातील विविध विभागांना जोडणारे मजबूत नेटवर्क स्थापित करणे हा आहे. स्थानिक विक्रेते, टूर ऑपरेटर आणि प्रवासी ते मोटरसायकल एन्थुझिायस्ट यांना यातून एकत्र आणले गेले आहे.

Royal Enfield Motoverse 2023
IIT Goa Placement: आयआयटी गोवाच्या 105 पैकी 104 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट; वार्षिक 17 लाख रूपये पगार...

मोटोथ्रिल

मोटोव्हर्सच्य या उपक्रमात मोटारसायकलिंग आहे. मोटोथ्रिलमध्ये वेगवेगळ्या रायडिंग शैली असतील. फ्लॅगशिप डर्ट ट्रॅकपासून, नवशिक्या रायडर्ससाठी रेसिंग प्लॅटफॉर्म; स्लाईड स्कूल, ओव्हल फ्लॅट ट्रॅकवर कौशल्ये शिकणे, ट्रेल स्कूल, ऑफ-रोडिंग प्रशिक्षण कार्यक्रम, हिल क्लाईंब यांसह आर्ट गॅलरी देखील यंदा असणार आहे.

मोटोसॉनिक

यात विविध संगीत मैफिलींसह विविध कलाकार सहभागी होतील. हिप-हॉपच्या 50 वर्षांचा उत्सव देखील सेलिब्रेट केला जाईल. गायक बेनी दयाल, संगीतकार गौरी लक्ष्मी, इंडी-पॉप जोडी, Ranj & Cliffr, Oaff x Savera टेक पांडा एक्स केन्झानी हे देखील या कार्यक्रमातील आकर्षण असणार आहे.

Motoville

या इव्हेंटमध्ये देशभरातील खाद्यपदार्थ असलेला F&B अरेना, संगीत आणि ओपन माईक मैफिली, एक्सप्लोरेशन सेंटर असे उपक्रम असतील.

Royal Enfield Motoverse 2023
Goa-Mumbai Bus Accident: गोवा-मुंबई खासगी बसचा कोल्हापुरात अपघात; एकाच कुटूंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू

मोटोरील

यात प्रेक्षक साहसी रायडर प्रेरणादायी कथा, अनुभव सांगतील. यात डकार रॅली रेसर, बेस जम्पर, चित्रपट निर्माता, गिर्यारोहक सहभागी होतील.

मोटोशॉप

मोटोशॉप येथे मोटरसायकल अॅक्सेसरीज, रायडिंग गियर आणि पोशाख यांचा समावेश असेल.

हिल टॉप, वागातोर येथे तीन दिवस हा कार्यक्रम होणार आहे. याचे शुल्क 3500 रूपये प्रती व्यक्ती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com