Sacorda Network Issue Dainik Gomantak
गोवा

Out of Network Village: 21व्या शतकात गोव्यातील हे गाव 'आउट ऑफ नेटवर्क'! रेंज नसल्याने गाव ओसाड पडण्याची भीती; विद्यार्थी, नोकरदारांना फटका

Sacorda Network Issue: धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा भागात नेटवर्क कनेक्टिविटीच्या समस्येमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Sameer Panditrao

Goa Battles Poor Network: धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा भागात नेटवर्क कनेक्टिविटीच्या समस्येमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बाह्य जगाशी संपर्क तुटतो. याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसतो. डिजिटल व्यवहारांवरही मर्यादा येते. त्यामुळे येथील अनेक कुटुंब अन्य भागात स्थलांतरित झाली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास हा गाव ओसाड पडेल, अशी धास्ती ग्रामस्थांना वाटते.

येथील नेटवर्क कनेक्टिविटीत नेहमीच समस्या असते, त्यामुळे मोबाईल नेहमी ‘आउट ऑफ कवरेज’ असतात. त्यामुळे संपर्काचे माध्यम तुटते. येथील देऊळवाडा आणि अन्य भागात ही समस्या अधिक आहे. त्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने या समस्येत अधिक भर पडते.

याबाबत स्थानिकांनी सांगितले की, सरकार आज डिजिटल व्यवहारांवर भर देत आहे. मात्र त्यासाठी चांगल्या नेटवर्क कनेक्टिविटीची गरज आहे. साकोर्डा त्याबाबत खूप मागे आहे. यात सुधारणा आवश्यक आहे.

याबाबत येथील बिपिन नाईक यांनी सांगितले की, साकोर्डा हे दुर्गम गाव आहे. डिजिटल क्रांतीसाठी सरकारने नेटवर्क सुविधांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गॅस बुकिंग, रेशन, ऑनलाइन पेमेंट, आधार कार्ड लिंक, रुग्णवाहिका इत्यादी सेवांसाठी डिजिटल सुविधांची आवश्यकता आहे.

साकोर्डात बीएसएनएलचे एकच नेटवर्क आहे, परंतु त्यात अनियमितता आहे, नेहमी नेटवर्क खराब असते. वीज खंडित झाली तर नेटवर्क खंडित होते. यामुळे गावाचा संपर्क तुटतो. तसेच सर्व डिजिटल व्यवहारांवर मर्यादा येते. काहींनी वायफाय सुविधा घेतली तरी राउटरही काम करत नाहीत.

विद्यार्थ्यांना जावे लागते टेकडीवर

देऊलवाडा साकोर्डा येथील प्रदीप वेरेंकर म्हणाले की, स्थानिकांना नेटवर्क कनेक्टिविटीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल इंडियाबद्दल दावे करतात पण त्याचा फायदा घेण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. माझी मुलगी नुकतीच नीटची परीक्षेची तयारी करत असून तिला ऑनलाइन अभ्यास करावा लागतो, पण रेंज नाही. मी वायफायची व्यवस्था केली, परंतु वीज खंडित झाल्यामुळे वायफाय कनेक्टिव्हिटी बंद पडते. त्यामुळे ती अभ्यास करू शकत नाहीत. परीक्षेच्या वेळी कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी आम्ही टेकडीवर जातो. रात्री उशिरापर्यंत थांबतो. सरकारने नेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माने टी-20 मध्ये रचला इतिहास, कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला; मॅक्सवेललाही पछाडलं

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

SCROLL FOR NEXT