Sacorda: पाण्याविना पिके लागली करपायला, साकोर्डातील बागायतदार संतप्त; इरिगेशन प्लांटवर दिली धडक

Sacorda Udalshe: बागायतदारांना पूर्वकल्पना न देता बंधाऱ्याचे पाणी अकस्मात सोडल्याने पोफळी, केळी व मिरी बागायती करपायला लागल्या आहेत.
Sacorda Udalshe
Sacorda UdalsheDainik Gomantak
Published on
Updated on

Sacorda Udalshe

तांबडीसुर्ला: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील उदळशे येथील बंधाऱ्यात साठवून ठेवलेले पाणी नदीच्या काठावर दरड बांधकाम करण्याच्या नावाखाली सोडण्यात आल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या बागायतदारांवर जलसंकट आले आहे.

बागायतदारांना पूर्वकल्पना न देता बंधाऱ्याचे पाणी अकस्मात सोडल्याने पोफळी, केळी व मिरी बागायती करपायला लागल्या आहेत. तसेच अनेक बागायतदारांच्या बागायतीत सुपारीला गळती लागल्याने संतप्त झालेल्या बागायतदारांनी आज मंगळवारी सकाळी उदळशे येथील लिफ्ट इरिगेशन प्लांटवर धडक दिली.

सरकारी अधिकारी यावेळी तेथे उपस्थित नसल्याने त्यांना तत्काळ बोलावण्यात आले. अधिकाऱ्यांनी बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या.

Sacorda Udalshe
Sacorda Pumphouse: साकोर्ड्यात हजारो लिटर पाण्याची नासाडी! पंपहाऊस गळतीबाबत चालढकल; पत्रकारांच्या भेटीनंतर दुरूस्ती

१० एचपी पंपची व्यवस्था करून नदीतील पाणी पंपिंग करून ते लिफ्ट इरिगेशन प्लांटमध्ये सोडण्यात येईल. यासाठी बागायतदारांनी थोडी कळ सोसावी, अशी विनंती कार्यकारी अभियंता खांडेपारकर यांनी केली. त्यानंतर बागायतदार शांत झाले. साहाय्यक अभियंता लुकास, स्थानिक पंच जितेंद्र कालेकर, महादेव शेटकर व बागायतदारांची उपस्थिती होती.

उदळशे-साकोर्डा येथे रगाडा नदीच्या काठावर संरक्षक भिंतीचे बांधकाम सरकारने सुरू केले आहे, त्याला विरोध नाही. परंतु बागायतदारांना पाण्याची खरी गरज असताना बांधकाम करणे चुकीचे आहे. जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी काढलेला तोडगा हा तात्पुरता आहे. बागायतीचे पाण्याअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर सरकारने उपाययोजना करावी.

महादेव शेटकर, पंचसदस्य, साकोर्डा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Subhash Shirodkar Water Management
Goa Karnataka Water Dispute
Cold water during periods myth
Goa Dam Water Supply
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com