Mobile Cancer Diagnosis Van inaugrated By Shripad Naik, Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik: फिरत्या कर्करोग निदान केंद्रामुळे गाव पातळीवर शिबिरे घेणे शक्य

गोमन्तक डिजिटल टीम

फिरत्या कर्करोग निदान वाहनामुळे गाव पातळीवर शिबिरे घेणे शक्य होणार आहे. असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आरोग्यसेवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न होत राहिले पाहिजे, असे मत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी (ता.११) बांबोळी येथे व्यक्त केले. ते कर्करोग निदान करण्याची सोय असलेल्या वाहनाचे उद्‍घाटन केल्यानंतर बोलत होते.

यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आदी उपस्थित होते.

नाईक व इतरांनी नारळ वाढवून व फीत कापून या फिरत्या कर्करोग निदान केंद्ररूपी वाहनाचे उद्‍घाटन केले. यानंतर नाईक म्हणाले, संरक्षण राज्यमंत्री असताना कंपन्यांना आरोग्य क्षेत्रासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्यातून भारतीय हेवी इलेक्ट्रिक लि. या कंपनीने या प्रकल्पासाठी ४ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून बसरूपी हे फिरते कर्करोग निदान केंद्र प्रत्यक्षात आणले याबद्दल त्यांचे अभिनंदन.

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले की, गावागावांत ही बस पाठविली जाईल. नाईक यांनी आपल्या आवाहनाच्या माध्यमातून रुग्णवाहिकांसाठीही मदत केली आहे. आजचे उद्‍घाटन हा सर्वांसाठी एक प्रेरणादायी क्षण होता. या उदात्त उपक्रमासाठी नाईक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. केरळमधील सीडॅक कंपनीने या बसची निर्मिती केली आहे. कर्करोगाशी लढण्यासाठी ही बस एक मोठे पाऊल आहे.

‘सीडॅक’चे तज्ज्ञ देणार प्रशिक्षण

ब्लड सेल काउंटर, इम्युनो ॲनालिझर, डिजिटल मॅमोग्राफी मशीन, अल्ट्रासाऊंड मशीन आणि कोल्पोस्कोपी आणि क्रायोसर्जरी यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी ही बस आहे. सीडॅकचे तज्ज्ञ पुढील तीन दिवसांत आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील.

त्यानंतरचे पहिले शिबिर २३ जुलै रोजी मंडूर सरकारी ग्रामीण दवाखाना येथे होईल, त्यानंतर गोव्यात आणखी शिबिरे होतील. राज्यात कर्करोगाशी लढण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि राज्यासाठी परिवर्तनशील उपक्रम सुरू ठेवू, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT