Union Minister of State Shripad Naik
Union Minister of State Shripad NaikANI

Shripad Naik: गोव्याला केंद्रीय राज्यमंत्री पद! श्रीपाद नाईक यांनी घेतली शपथ

Union Minister of State Shripad Naik: उत्तर गोव्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या मोदी सरकारमध्येही नाईक मंत्री होते.
Published on

Union Minister of State Shripad Naik: नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पतंप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी दुसरे नेते ठरले. मोदी मंत्रिमंडळात गोव्यालाही प्रतिनिधित्व मिळाले. उत्तर गोव्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या मोदी सरकारमध्येही नाईक मंत्री होते.

गेल्या काही दिवसांपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? कोणाचा पत्ता कट होणार? यासंबंधीच्या चर्चांना उधान आले होते. याचदरम्यान नाईकांचाही शपथविधी होणार अशी बातमी सकाळी आली होती. या बातमीनंतर लगेच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रीया दिली होती. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये श्रीपाद भाऊंच्या रुपाने गोव्याला प्रतिनिधित्व मिळत आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. याचा फायदा गोवा सरकार तसेच समस्त गोवेकरांना होणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते.

Union Minister of State Shripad Naik
Shripad Naik: श्रीपाद भाऊंच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ? उत्तर गोव्यातून बाजी मारताच चर्चांना उधाण

याशिवाय, नाईकांना दिल्लीतील निवासस्थानी राज्य सरकारमधील मंत्री सुदीन ढवळीकर, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री अलेक्स सिक्वेरा आणि आमदार दिगंबर कामत यांनीही सकाळी शुभेच्छा दिल्या होत्या. यंदाच्या लोकसभा निवडणूकीतही उत्तर गोव्यातून विक्रमी मताधिक्याने श्रीपाद नाईक विजयी झाले. त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ पडणार हे नक्की होते. मात्र आता, नाईकांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेऊन यावर शिक्कामोर्तब केला. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात नाईकांना पुन्हा एकदा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार अशी चर्चा होती. या चर्चांना नाईकांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेऊन पूर्णविराम दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com