Vijai Sardesai On Ramdas Athawale Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: हा जोक आहे की, हीच भाजपची पॉलिसी आहे? आठवलेंच्या वक्तव्यावर आमदार सरदेसाई संतप्त

डबल इंजिन सरकार पुन्हा एसटी समुदायाची फसवणूक करणार का?

Akshay Nirmale

Vijai Sardesai On Ramdas Athawale: गोव्यात एसटी समुदायाची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळणे कठीण आहे, असे वक्तव्य गोव्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले होते.

त्याचे पडसाद आता गोव्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी यावरून भाजप सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे.

आमदार सरदेसाई म्हणाले की, हा जोक आहे की हीच भाजप सरकारची पॉलिसी आहे? केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणतात की, गोव्यात एसटी समुदायाला आरक्षण मिळणे शक्य नाही. हे वक्तव्य धक्कादायक आणि संशयास्पद आहे. केंद्रीय मंत्र्यांचे हे वक्तव्य गंभीर आहे.

गोवा विधानसभेने एकमताने गोवा सरकारला विनंती केली होती की, केंद्र सरकारकडे एसटी आरक्षणासाठी पाठपुरावा करावा. या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पावले उचलावलीत. शक्य तितक्या लवकर या समाजाला आरक्षण द्यावे.

तथापि, आता खुद्द केंद्रीय मंत्रीच याविरोधात बोलत आहेत. त्यामुळे गोवा भाजपने आणि गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत तत्काळ स्पष्टीकरण दिले पाहिजे. राज्य सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

गोव्याच्या नागरिकांना कळले पाहिजे, गोवा सरकारची भूमिका काय आहे. डबल इंजिन सरकार पुन्हा एसटी समुदायाची फसवणूक करणार आहे का? असा सवालही विजय सरदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT