MLA Krishna Salkar
MLA Krishna Salkar  Dainik Gomantak
गोवा

आमदार कृष्णा साळकरांनी वास्को येथील विकासकामांची केली पाहाणी

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी वास्को येथील बागायतदार बाजाराजवळ मूरगावच्या उपजिल्हाधिकारी, गॅमन इंडियाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह महामार्गाला जोडणाऱ्या रॅम्पच्या नियोजित जागेची पाहणी केली.

(MLA Krishna Salkar inspected the development works at Vasco)

वास्को हे नियोजनबद्ध शहरापैकी एक आहे. मात्र सध्या शहरात ज्या पद्धतीने विकास कामे केली जात आहे ते पाहता, शहराचे सौंदर्य नष्ट होण्यासोबत शहरात वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे. त्यामुळे शहरातील आयओसी जंक्शन, एफएलगोम्स मार्गावर, गोवा बागायतदार व भाजी मार्केट समोर होणारी प्रस्तावित रॅम्प प्रकल्पाला बिगर सरकारी संस्था गोवा फर्स्टने आक्षेप घेतला आहे.

या प्रकल्पामध्ये एमपीएमध्ये जाणाऱ्या उड्डाणपुलाला जोडून वास्को शहरात उतरण्यासाठी येथील गोम्स महामार्गावर उड्डाणपुलाचा एक भाग उतरला जाईल. त्यासाठी एफ एल गोम्स मार्गावर या प्रस्ताविक प्रकल्पासाठी रॅम्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

2018 साली या कामाला सुरुवात होणार होती. मात्र गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने सदर काम बंद करण्यास भाग पाडले होते. तेव्हापासून प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले होते. मात्र आता परत एकदा या प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. दरम्यान या प्रास्ताविक प्रकल्पाला गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने पुन्हा एकदा आक्षेप घेऊन संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

कारण सध्याची रुंदी अंदाजे 18 मीटर आहे. जी 10 ते 11 मीटर इतकी कमी केली जाणार आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होणार आहे. आयओसी टर्मिनल, पोलीस स्थानक, हॉटेल्स, मॉल, वास्को-भाजी मार्केट या रॅम मुळे प्रभावित होणार आहे. त्यामुळे मुरगाव वासियांना त्याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे संस्थेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेच्या तक्रारीला अनुसरून वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी वास्को येथील गोम्स मार्गावरील प्रस्ताविक रॅम्प प्रकल्पाच्या ठिकाणी म्हणजेच गोवा बागायतदार बाजाराजवळ गेमेन इंडियाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह महामार्गाला जोडणाऱ्या या रॅमच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी वाहतूक खात्याचे पोलीस उपाधीक्षक धर्मेश आंगले उपस्थित होते. तसेच समाजसेवक सावियो कुतिन्हो ज्याचा या रॅम प्रकल्पाला विरोध आहे तेही उपस्थित होते.

दरम्यान वाहतूक खात्याचे पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी बोलताना सदर नियोजित रॅम प्रकल्पाला आक्षेप घेतला कारण एफएलगोम्स मार्ग हा वास्को शहरातील प्रमुख मार्ग असून रस्त्याची रुंदी पाहता या महामार्गावर हा प्रकल्प सोयीस्कर नसल्याचे ते म्हणाले. तसेच अवजड वाहनांची वाहतूक रहदारी स्वतंत्र पथ मार्गावरून वळवणे सोयीस्कर नसल्याचे ते म्हणाले. कारण स्वतंत्र पथ मार्गाची रुंदी कमी आहे. त्यासाठी सदर प्रकल्प दुसऱ्या बाजूने वळवणे सोयीस्कर असे ते म्हणाले.

दरम्यान वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बोलताना सदर प्रास्तावित प्रकल्पाच्या नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी आज बोलावण्यात आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यात आली असून, काही तक्रारींना अनुसरून सदर पाहणी केली असल्याचे ते म्हणाले. लोकांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा बैठक बोलावून या प्रकल्पाविषयी विचार विनिमय केला जाईल असे साळकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT