Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: 'मराठी'ला दुसरी राजभाषा करा! आरोलकरांची शून्‍य प्रहराला मागणी; युरी, विजय यांचा आक्षेप

Jeet Arolkar: युरी आणि विजय यांनी उभे राहत आमदार आरोलकर शून्‍य प्रहराला अशी मागणी करूच शकत नाहीत, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. सभापतींनी आरोलकर यांना उल्लेख करण्‍यास परवानगी दिली.

Sameer Panditrao

पणजी: मराठीला दुसरी राजभाषा म्‍हणून मान्‍यता देण्‍यात यावी, अशी मागणी आमदार जीत आरोलकर यांनी गुरुवारी शून्‍य प्रहरात केली. परंतु, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी याला तीव्र आक्षेप घेतला.

मराठी राजभाषा कायदा सभागृहात संमत झालेला आहे. त्‍यामुळे त्‍याबाबत शून्‍य प्रहराला कोणताही उल्लेख करता येत नाही. गरज भासल्‍यास सरकारने कायदा दुरुस्‍ती करावी, असे आमदार विजय सरदेसाई म्‍हणाले.

मराठीप्रेमींसाठी सरकारने मराठी भाषेला दुसरी राजभाषा म्‍हणून मान्‍यता द्यावी, अशी मागणी करणारा उल्लेख आरोलकर यांनी शून्‍य प्रहराला करताना युरी आणि विजय यांनी उभे राहत आमदार आरोलकर शून्‍य प्रहराला अशी मागणी करूच शकत नाहीत, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सभागृहात एखादा कायदा संमत झाल्‍यानंतर त्‍याबाबत शून्‍य प्रहराला उल्लेख किंवा मागणी करता येत नाही. गरज असल्‍यास सरकारने कायदा दुरुस्‍ती करावी, असे सरदेसाई म्‍हणाले. त्‍यावेळी आमदार आरोलकर यांनी मांडलेला ठराव योग्‍यच असल्‍याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. यावरील वादंग शमल्‍यानंतर सभापतींनी आरोलकर यांना उल्लेख करण्‍यास परवानगी दिली.

वर्तमानपत्रे, कार्यक्रम मराठीतूनच

राज्यात अनेक लोक मराठी बोलतात, आरती, धार्मिक कार्यक्रम मराठीतून होतात. अनेक वर्तमानपत्रे मराठीतून प्रसिद्ध होतात, मग मी मराठीला दुसरी राजभाषा म्‍हणून मान्‍यता देण्‍याची मागणी का करू शकत नाही, असा सवालही आरोलकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT