Marathi Language: मराठी राजभाषा आंदोलनाची ताकद वाढवणार! 40 संमेलनाचे आयोजन; मराठी युवकांचा सहभाग

Subhash Velingkar: मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मराठी मातृशक्ती या स्वतंत्र संघटनात्मक महिला युनिटचा कार्यारंभ ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांच्या हस्ते प्रतीकात्मक दीप प्रज्वलित होऊन करण्यात आला.
Subhash Velingkar, Marathi language committee Goa
Subhash VelingkarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मराठी राजभाषा आंदोलनाची ताकद वाढवण्यासाठी गोवाभर २० मराठी मातृशक्ती संमेलने आणि २० मराठी युवा संमेलने येत्या ५ महिन्यात मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे आयोजित करण्यात येतील, अशी घोषणा राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी मराठी मातृशक्तीच्या कार्यारंभ बैठकीत करण्यात आली.

मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मराठी मातृशक्ती या स्वतंत्र संघटनात्मक महिला युनिटचा कार्यारंभ ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांच्या हस्ते प्रतीकात्मक दीप प्रज्वलित होऊन करण्यात आला. फोंडा येथील थ्रिफ्ट सोसायटी सभागृहात झालेल्या या कार्यारंभात गोव्यातील १८ प्रखंडातील प्रमुख निवडक ४० महिलांची मराठी मातृशक्तीची गोवा राज्य समिती स्थापन करण्यात आली.

मराठी मातृशक्तीच्या राज्यप्रमुख डॉ. प्रा. अनिता तिळवे यांनी याप्रसंगी मराठी राजभाषा चळवळीसाठी समितीने आपल्या सोयीने तयार केलेल्या तीन जिल्ह्यांच्या जिल्हा प्रमुख व जिल्हा सहाय्यक पुढीलप्रमाणे -

Subhash Velingkar, Marathi language committee Goa
Marathi Schools Goa: सरकारी मराठी शाळा बंद पाडण्यासाठी पालक नव्‍हे, सरकार जबाबदार नाही का? वेलिंगकरांचा सवाल

उत्तर गोवा : जिल्हाप्रमुख - ॲड. रोशन सामंत, म्हापसा. सहाय्यक - शुभदा कळंगुटकर, डिचोली, मध्य गोवा: जिल्हाप्रमुख नीना नाईक, पणजी, साहाय्यक - चित्रा क्षीरसागर, ताळगाव, दक्षिण गोवा: जिल्हाप्रमुख - पूर्णिमा देसाई, मडगाव. साहाय्यक - विशाखा देसाई, कुंकळ्ळी यांची नियुक्ती करण्यात आली.

Subhash Velingkar, Marathi language committee Goa
Marathi Language: 'मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देणारच'! फोंड्यात निर्धार; मातृशक्ती समित्यांची होणार निवड

जागृतीसाठी उपक्रम!

१० ऑगस्टपर्यंत प्रखंडांच्या मराठी मातृशक्ती समित्या स्थापन करून त्यांच्या विस्तारातून गोवाभर ‘मराठी मातृशक्ती’ची संमेलने घेण्याबाबत बैठकीत निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी सविस्तरपणे मांडली. या संमेलनातून मराठी राजभाषेसाठी जागृती करण्यात येणार आहे, त्यासाठीच अशा प्रकारची संमेलने घेण्यात येणार आहेत, असे वेलिंगकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com