Arrested Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीची सोलापुरातून सुटका, अपहरणप्रकरणी सांगोल्डा येथील तरुणाला ठोकल्या बेड्या; साळगाव पोलिसांची कारवाई

Minor Girl Kidnapping Goa: अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी साळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सांगोल्डा येथील जोशुआ (वय वर्ष 19) या तरुणाच्या मुसक्या आवळल्या.

Manish Jadhav

Minor Girl Kidnapping Goa: अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी साळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत सांगोल्डा येथील जोशुआ (वय वर्ष 19) नावाच्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. तसेच, पीडितेची सोलापूर (महाराष्ट्र) येथून सुखरुप सुटका केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांनी 9 जून रोजी साळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली असून, तिचे अपहरण करण्यात आले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली होती.

पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा ठावठिकाणा शोधून काढण्यात आला. तपासादरम्यान संशयित जोशुआ सोलापूरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर साळगाव पोलिसांचे पथक तिकडे रवाना करण्यात आले. त्याठिकाणी पोलिसांनी साक्षीदारांच्या मदतीने कारवाई करत जोशुआला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीचीही सुखरुप सुटका केली. सदर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे, या प्रकरणात पोलिसांनी संशयिताविरोधात भारतीय दंड संहिता (BNS) आणि गोवा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला म्हापसा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT