पणजी: पणजी महानगरपालिकेचे स्वच्छतेचे मॉडेल पुढे नेणे आवश्यक आहे. स्वच्छता राखल्यास पर्यटनाला अधिक फायदा होईल. केवळ सरकारनेच स्वच्छता करावी असे नाही, तर नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी. लोकांनी प्रामाणिकपणे स्वच्छतेत सहभाग घेतल्यास वेगळा गोवा पाहायला मिळेल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
केंद्रीय आरोग्य खात्याच्या वतीने देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा : एक दिन, एक घंटा, एक साथ’ या उपक्रमाची अंमलबजावणी गोव्यातही करण्यात आली. आरोग्यमंत्री राणे यांनी आज गुरुवारी सकाळी पणजीतील कदंब बसस्थानकावर हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. त्यावेळी ते बोलत होते.
या अभियानात आरोग्य खात्याचे अधिकारी, कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अधिकारी, डीएमएचे संचालक ब्रिजेश मणेरकर, बँकांचे अधिकारी सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम राबविली.
देशातील शहरे आणि राज्यातील नगरपालिका क्षेत्रात ही मोहीम अधिक गतीने राबविण्यासाठी जागृती सुरू आहे. आम्ही सर्व पालिकांना त्याबाबत सूचित केले आहे. सर्वप्रथम आपला परिसर, नंतर गाव तथा प्रभाग, शहर आणि मग राज्य अशा क्रमाने स्वच्छता होणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.