Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai: गोव्यातील 'आयआयटी'साठी जागा ठरली! महिनाअखेरपर्यंत मुख्यमंत्री करणार घोषणा...

Akshay Nirmale

Subhash Phaldesai on land for IIT in Sanguem: गेल्या काही काळापासून गोव्यात आयआयटीसाठी जमिन देण्यावरून राज्य सरकार आणि स्थानिक नागरीकांमध्ये संघर्ष सुरू होता. तथापि, आता गोव्यात होणाऱ्या या आयआयटीची जागा ठरली असून त्यासाठी 10 लाख चौरस मीटर जमिन देखील निश्चित्त करण्यात आली आहे.

सांगे तालुक्यात आयआयटी होणार आहे. तथापि, त्यासाठी पूर्वी निश्चित्त केलेल्या जमिनीला स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. तथापि, सांगे तालुक्यातच आयआयटी होणार हे सरकारकडून ठामपणे सांगण्यात येत होते.

सांगे तालुक्यातीलच नवीन जागा यासाठी निश्चित्त करण्यात आली आहे. सुमारे 10 लाख चौरस मीटर इतकी ही जागा आहे. याबाबतची घोषणा या महिन्यातच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे करतील, अशी माहिती, आमदार आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

हा महिना संपायला अवघे चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे लवकरच आयआयटीबाबतची घोषणा गोमंतकीयांच्या कानी पडू शकते. स्थानिकांच्या विरोधामुळे आधीच या प्रकल्पाला विलंब होत चालला आहे.

याच महिन्यात मंत्री फळदेसाई यांनी पुढील तीन महिन्यांमध्ये आयआयटीच्या कामाला सुरवात होणार असल्याचे सांगितले होते. मात्र तेव्हा त्यांनी जागा कुठे असेल, हे स्पष्ट केलेले नव्हते.

रिवण गावातील जागेची पाहणी करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच काणकोणमधील एक जागाही तज्ज्ञांना दाखवणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

किमान सहा लाख चौरस मीटर जागा, रस्ते, पाणी, वीज पुरवठा या सोयी असल्या पाहिजेत, याचा विचार करून जागा निश्चित्त करण्यात येणार असल्याचे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT