Monsoon 2023 Withdrawal: मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात; देशात यंदा सरासरीपेक्षा 6 टक्के कमी पाऊस

सलग 13 व्या वर्षी मॉन्सूनचे विलंबाने प्रस्थान, गोव्यात मुसळधार शक्य
Monsoon 2023 Withdrawal
Monsoon 2023 WithdrawalDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon 2023 Withdrawal: देशातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला आजपासून (17 सप्टेंबर) सुरूवात झाली. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यंदा मान्सून नेहमीपेक्षा आठ दिवस उशिराने प्रस्थान करत आहे.

नैऋत्य मोसमी पावसाने आज, सोमवारी नैऋत्य राजस्थानमधून माघार घेतली आहे. खरे तरं, आधीच्या अंदाजानुसार मॉन्सूनच्या परतीला 17 सप्टेंबर सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली गेली होती.

IMD च्या मते, मान्सून उशिराने निघण्याचे हे सलग 13 वे वर्ष आहे. वायव्य भारतातून मान्सून माघार घेतल्यानंतर भारतीय उपखंडातून मान्सूनचे प्रस्थान सुरू होते, असे मानले जाते.

Monsoon 2023 Withdrawal
Goa-Mumbai Vande Bharat: इतर वंदे भारत गाड्यांच्या तुलनेत गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला कमी प्रतिसाद?

मान्सूनचे प्रस्थान होण्यास उशीर झाला याचा अर्थ पावसाळा लांबला. बऱ्याचदा त्याचा शेतीसाठी फायदा होत असतो. यंदाही तसा फायदा अपेक्षित आहे. तथापि, देशात यंदा आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 6 टक्के कमी पाऊस झाला आहे.

साधारणपणे, नैऋत्य मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. त्याच वेळी, 17 सप्टेंबरपासून मॉन्सून वायव्य भारतातून (राजस्थान) परतायला सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस संपूर्ण देशातून जातो.

या वर्षी आतापर्यंत देशात 796.4 मिमी पाऊस पडला आहे. जो एरवीच्या सामान्य पावसापेक्षा (843.2 मिमी) 6 टक्के कमी आहे.

Monsoon 2023 Withdrawal
Goa BITS Pilani: गोव्यातील विद्यार्थ्यांला वर्षाला 60 लाख रूपये पगार; आंतरराष्ट्रीय संस्थेने दिली ऑफर...

दरम्यान, आयएमडीने आज, सोमवारी देशातील 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

दरम्यान, देशातून पावसाचे वातावरण कमी होऊ लागले आहे. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टीला सुरू झाली आहे. झोजिला, लडाखमध्ये हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. येथील महिला या हिमवर्षावाचा आनंद घेताना दिसल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com