काणकोण: गणेश चतुर्थी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा सण. राज्यात सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन नुकतेच पार पडले. काणकोणमध्ये मात्र गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत एक आगळावेगळा उत्साह पाहायला मिळाला. राज्याचे नवनिर्वाचित कला-संस्कृती तसेच क्रीडा मंत्री आणि काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांनी चक्क 'हायो रब्बा' या हिंदी गाण्यावर ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मंत्री रमेश तवडकर हे आदर्श युवा संघाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत स्वतःहून सहभागी झाले होते. त्यांनी फक्त उपस्थितीच लावली नाही, तर तरुणाईसोबत गाण्यावर ठेका धरून सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर झालेल्या पारंपरिक विसर्जन मिरवणुकीतही त्यांनी सहभाग घेतला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विधानसभेचे सभापती म्हणून काम पाहिल्यानंतर आता मंत्री तवडकर यांनी कला आणि संस्कृती तसेच क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांच्याकडे असलेले ही खाती आता त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
त्यामुळे, आपल्या नव्या भूमिकेचा त्यांनी पूर्ण जोशने स्वीकार केला असल्याचे त्यांच्या या कृतीतून दिसून आले आहे. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्यातील साधेपणा आणि लोकांशी सहज जोडले जाण्याची वृत्ती दर्शवतो, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.