Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: टॅक्सी व्यवसायिकांनी ‘गोवा माईल्स’मध्ये सहभागी व्हावे; युनियनचा विरोध कायम

यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही - मंत्री गुदिन्हो

दैनिक गोमन्तक

Minister Mauvin Godinho यांनी दाबोळी विमानतळावरील काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यवसायिकांनी गोवा माईल्स 'ॲप'मध्ये सहभागी व्हावे, असा सल्ला दिला. असे असताना दुसऱ्या बाजुला काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यावसायिकांनी गोवा माईल्ससोबत न जाता, स्वत:चे 'अ‍ॅप' तयार करणार असल्याचे म्हटले आहे.

(Minister Mauvin Godinho requested Dabolim taxi operators to participate in the 'Goa Miles' app)

मिळालेल्या माहितीनुसार या दौऱ्यावेळी वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांना सेवा देणाऱ्या टॅक्सी व्यवसायिकांच्या विरोधाबाबत माहिती घेतली, तसेच इतर ठिकाणी पाहणी करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी विमानतळावर येणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास होता कामा नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सुचना अधिकारी वर्गाला दिल्या.

यावेळी वाहतुकमंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, जर टॅक्सी व्यवसायिकांना गोवा माईल्समध्ये जायचे असेल तर त्यांचे स्वागत केले जाईल. तसेच पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी दाबोळी विमानतळावरील सर्व टॅक्सी व्यवसायिकांनी प्रामाणिकपणे कार्य करावे. पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी राज्य सरकार विविध प्रकारे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'गोवा माईल्स'मध्ये जाणार नाही - युनायटेड टॅक्सीमॅन युनियन

टॅक्सी व्यवसायिकांना गोवा माईल्समध्ये सहभागी व्हा असे गुदिन्हो यांनी सांगितले असले तरी, दाबोळी विमानतळावर गेली 50 वर्षा पेक्षा जास्त काळ पर्यटकांना सेवा देणाऱ्या काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यवसायिक युनियनने गोवा माईल्समध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच युनियन काळ्या - पिवळ्या टॅक्सी व्यवसायिक पर्यटकांसाठी वेगळे अ‍ॅप तयार करणार अशी घोषणा केली.

यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही- मंत्री गुदिन्हो

राज्याला दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ महत्त्वाचे आहेत. मात्र, सध्या दाबोळीवर टॅक्सी व्यावसायिकांची सुरू असलेली मनमानी येत्या काळात त्रासदायक ठरणार आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आमची जबाबदारी असून यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असे गुदिन्हो म्हणाले.

या दौऱ्यात मंत्री गुदिन्हो यांच्यासमवेत वाहतुक संचालक राजन सातार्डेकर, कदंब वाहतुक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. नेटो, सरव्यवस्थापक राजन घाटे, दाबोळी विमानतळ संचालक अनंत राव, मुरगाव तालुका सहाय्यक वाहतुक संचालक राजेश नाईक, दाबोळी विमानतळ वाहतुक पोलिस निरीक्षक राहुल धामस्कर, युनायटेड टॅक्सीमॅन युनियनचे अध्यक्ष विद्याधर दिवकर, प्रसाद प्रभूगावकर, संजय नाईक  उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT