Goa: दाबोळीचे "घोस्ट एअरपोर्ट" करण्यासाठीच टॅक्सीवाल्यांना दोष; युरी अलेमाव यांचा आरोप

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबद्दल स्पष्टीकरण देणे गरजेचे
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मोपा विमानतळ (Mopa Airport) कार्यान्वित झाल्यानंतर दाबोळी विमानतळ (Dabolim Airport) "घोस्ट एअरपोर्ट" होणार असल्याचा इशारा मी विधानसभेत दिला होता. वाहतूक मंत्री मॉविन गुदीन्हो (Mauvin Gondhino) यांनी आता जो दोषारोपाचा खेळ सुरू केला आहे. हे दाबोळी विमानतळ बंद करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दाबोळी विमानतळाच्या भवितव्याबद्दल स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (opposition leader yuri alemao) यांनी केली आहे.

Yuri Alemao
Goa Crime: आर्थिक व्यवहारातून एकाच्या गळ्यावर वार; रिसॉर्ट मॅनेजरला अटक

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दोन्ही विमानतळांच्या भवितव्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. गोमंतकीय कोणत्याही परिस्थितीत दाबोळी विमानतळ बंद करू देणार नाहीत, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले.गोव्यातील टॅक्सी चालक अॅप आधारित सेवांकडे वळले नाही तर दाबोळी विमानतळ बंद होईल, या वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केलेल्या विधानावर ते प्रतिक्रिया देताना युरी आलेमाव यांनी वरील इशारा दिला.

परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी केलेले विधान हे लोकांना पुढे काय वाढून ठेवले आहे याबद्दल सतर्क करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सहकार क्षेत्र बंद करून खाजगी व्यावसायीक व भांडवलदारांना प्रोत्साहन देण्याचे एकमेव धोरण आहे.

भाजप सरकारला दाबोळी विमानतळ बंद करून खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोपा विमानतळाला प्रोत्साहन द्यायचे आहे. त्याचप्रमाणे स्थानिकांचा टॅक्सी व्यवसाय संपवून गोव्यात बहुराष्ट्रीय टॅक्सी ऑपरेटर आणायचे आहेत, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

Yuri Alemao
Goa Government: मुदतपूर्व कर्मचारी निवृत्तीसाठी दोन समित्या स्थापन

सुरक्षित पायाभूत सुविधांसोबत चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी गोव्यातील मृत्यूचे सापळे बनलेले रस्ते सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे शेकडो जीवघेणे अपघात झाले, अशा महामार्ग बांधकाम ठेकेदारांवर कारवाई करण्याबाबत वाहतूक मंत्री गप्प का? असा थेट सवाल युरी आलेमाव यांनी विचारला आहे.

सरकारने टॅक्सी चालकांना तसेच इतर भागधारकांना विश्वासात घेऊन टॅक्सी चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकारची धमकीची भाषा यापुढे चालणार नाही, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com