Pandurang Madkaikar Dainik Gomantak
गोवा

Goa Corruption Case: 20 लाखांची लाच प्रकरण! माजी मंत्री पांडुरंग मडकईकरांची होणार चौकशी, ACB कडून हालचाली सुरु

Pandurang Madkaikar Inquiry: एका सत्ताधारी मंत्र्याला छोट्याशा कामासाठी १५ - २० लाख रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप माजी आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केला होता.

Sameer Panditrao

Pandurang Madkaikar Allegations Updates

पणजी: एका सत्ताधारी मंत्र्याला छोट्याशा कामासाठी १५ - २० लाख रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप कुंभारजुवेचे माजी आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केला होता. त्याच्या चौकशीची मागणी करणारी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) दाखल झाली आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीसाठी पांडुरंग मडकईकर यांना लवकरच कार्यालयात बोलावण्यात येणारअसल्याची माहिती ‘एसीबी’च्या सूत्रांनी दिली.

मडकईकर यांनी केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. मात्र, त्यांनी ही लाच कोणाला दिली, हे उघड केलेले नाही. त्यामुळे त्यांची याप्रकरणी जबानी नोंदवून माहिती मिळविणे आवश्‍यक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एसीबी’कडे आलेली तक्रारीची फाईल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आली होती. याप्रकरणी केलेल्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी मडकईकर यांना चौकशीसाठी बोलवावे, असा शेरा मारून तो चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी नोटीस पाठवून ‘एसीबी’च्या कार्यालयात बोलावण्यात येईल.

काशिनाथ शेट्ये आणि इतरांनी माजी आमदार मडकईकर यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करून ही लाच कोणाला देण्यात आली, त्याचा तपास करून कारवाई करावी. त्यांनी केलेले आरोप गंभीर असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनीही राज्यपालांना निवेदन देऊन या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या आरोपामुळे विरोधकांकडून चौकशीची मागणी होत असतानाच सरकार तसेच भाजपकडून असे काही घडलेलेच नाही, असा पवित्रा घेऊन कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

...तर मडकईकरही जबाबदार

मडकईकरांनी दिलेली ही रोख रक्कम ते दरवर्षी आयकर खात्याला सादर करत असलेल्या हिशोबातील आहे का, याची माहिती मिळवावी लागेल. लाच घेणे तसेच ती देणे, हा गुन्हा आहे. मडकईकर यांनी जर स्वतःचे काम करवून घेण्यासाठी ही रोख रक्कम दिली असेल, तर तेसुद्धा जबाबदार आहेत. त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती ‘एसीबी’च्या सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT