Goa Corruption Case: 20 लाखांची लाच प्रकरण! CBI चौकशी करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याचे गोवा राज्यपालांना पत्र

Goa Congress Writes to Governor: आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता तुम्ही सरकारला सीबीआयद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे द्यावेत - कंवठणकर
Goa Congress Writes to Governor
Congress leader sunil kawthankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते पांडुरंग मडकईकरांनी एक फाईल क्लिअर करण्यासाठी एका मंत्र्याला २० लाख रुपये लाच दिल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे तो मंत्री कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, सरकारमधील भ्रष्टाचारावर भाजप नेत्यानेच आरोप केल्याने विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मडकईकरांच्या आरोपांची सीबीआईमार्फत चौकशी करण्याची मागणी राज्यपालांकडे पत्राद्वारे काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनिल कंवठणकरांनी याबाबतचे पत्र राज्यपाल पी. एस. श्रीधन पिल्लई यांना पाठवले आहे. पांडुरंग मडकईकरांनी २० लाख रुपये मंत्र्याला लाच स्वरुपात दिल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे याप्रकरणाची तात्ळाळ सखोल चौकशी व्हायला हवी. आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता तुम्ही सरकारला सीबीआयद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्याचे द्यावेत, असे कंवठणकरांनी पत्रात म्हटले आहे.

Goa Congress Writes to Governor
Tuka Mhane Ata: स्त्रीशक्तीचा जागर! 'तुका म्हणे आता'; गोव्यातील महिलांनी एकत्र येऊन सादर केलेले सशक्त सादरीकरण

भ्रष्टाचार विरोधी कायदा १९८८ आणि भारतीय न्याय संहितेच्या आवश्यक कलमांखाली या आरोपांची चौकशी करुन काय ते सत्य समोर आणावे, असे कंवठणकरांनी पत्रात म्हटले आहे. भ्रष्टाचार लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देतो. तसेच, नागरिकांचा सरकारवरील विश्वासाला देखील ठेच बसते. याप्रकरणात लक्ष घालून तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी कंवठणकरांनी पत्राद्वारे केलीय.

मला आशा आहे की तुम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश द्याल, असे कंवठणकरांनी पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com