MRF Shed Dainik Gomantak
गोवा

Mapusa News :‘एमआरएफ’ शेड स्थलांतरित करा ; सिरसई ग्रामस्थांची मागणी, कोनशी झरीला धोका

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : म्हापसा, कोनशी झरीच्या संवर्धनाच्या मागणीसाठी सिरसई-अस्नोडा गावाच्या सीमेवर येत असलेल्या अस्नोडा साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी रविवारी (ता.२२) सिरसईवासीयांसह समविचारी लोकांनी मानवी साखळी केली.

पाणवठ्यांवर विपरित परिणाम होणार असल्याने ग्रामस्थांनी अस्नोडा पंचायतीला संबंधित एमआरएफ शेड स्थलांतरित करण्याची विनंती केली.

रविवारी सिरसई-अस्नोडा सीमेवर बांधकाम सुरू असलेल्या मटेरियल रिकव्हरी सुविधेला विरोध करण्यासाठी सिरसईचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, तरुण मुले यांच्यासह विविध समविचारी लोक गावात जमले.

अस्नोडा पंचायतीने प्रस्तावित केलेल्या एमआरएफला ग्रामस्थ विरोध करत आहेत. कारण, पावसाळ्यात कचरा पाण्याच्या प्रवाहात झरे व धबधब्यात वाहून येईल, आणि हाच कचरा नंतर विसर्जनासाठी ग्रामस्थ वापरत असलेल्या तलावात येईल, अशी भीती ग्रामस्थांना वाटते.

या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी घोषणा दिल्या व प्रस्तावित एमआरएफजवळ मानवी साखळीही केली. मनोज हळदणकर, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे, पर्यावरणवादी रमेश गावस, शंकर पोळजी, विद्याधर भगत आदींसह विविध मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

मनोज हळदणकर म्हणाले की, अस्नोडा पंचायतीने कोनशी येथे शेडचा प्रस्ताव दिल्याने पुढील तीन वर्षांत आमच्या गावातील हिरवळ नष्ट होण्याची शक्यता आहे.

भावी पिढ्यांसाठी आपण आपला निसर्ग जतन करायचा आहे. सिरसई गावासाठी हा झरा व तलाव महत्त्वाचे आहेत.

बार्देशच्या लोकांनी जागृत होऊन आपल्या भावी पिढीसाठी पर्यावरण संवर्धनासाठी काम केले पाहिजे. आमदार असलेले मंत्री आपल्या भावी पिढीसाठी काय करत आहेत, असा प्रश्‍नही येथे उपस्थित होत आहे.

- राजन घाटे, आरटीआय कार्यकर्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Driving Licence: गोव्यात 18 ऐवजी 16व्या वर्षीच लायसन्स दिले असते, काँग्रेस नेत्याचे विधान; परदेशात वयोमर्यादा काय?

Calangute News: लवकरच कळंगुटमध्ये होणार प्रशस्त कॉम्प्लेक्स आणि बसस्थानक; टाटा ट्रेन्सच्या साहाय्याने पंचायतीचा पुढाकार

..आता कडक कारवाईच! कचरा फेकणाऱ्यांचा फोटो काढून पोलिसांत तक्रार द्या; गोवा सरकार स्वच्छतेसाठी ॲक्शन मोडवर

मडगाव ऐतिहासिक घटनेला १३४ वर्षे पूर्ण! शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

'गोवा होलसेल विक्रीस काढलाय का'? मेगा प्रोजेक्ट, डोंगर कापणी, भू-रुपांतरावरुन वाढता जनआक्राेश

SCROLL FOR NEXT