Goa Cruise Vessels: यंदाच्या पर्यटन हंगामात गोव्यात येणार 31 आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे

प्रवाशांच्या स्वागतासाठी एजन्सी नेमणार
Goa Cruise Vessels | Tourism Season
Goa Cruise Vessels | Tourism Season Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cruise Vessels: गोव्याच्या पर्यटन हंगामाला एक ऑक्टोबरपासून सुरवात झाली आहे. दरम्यान, यंदाच्या पर्यटन हंगामात गोव्यात तब्बल 31 आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे दाखल होणार आहेत. 11 नोव्हेंबरपासून मे 2024 या काळात ही क्रूझ जहाजे येणार आहेत.

या जहाजांमधून गोव्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे पारंपरिकरित्या स्वागत केले जाणार आहे. गोव्याचा पर्यटन विभाग हँडिक्राफ्ट वस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन पर्यटकांचे स्वागत केले जाणार आहे. 11 नोव्हेंबरपासून मुरगाव बंदरात पर्यटक दाखल व्हायला सुरवात होईल.

Goa Cruise Vessels | Tourism Season
Goa Students: गोव्यातील 4 शालेय विद्यार्थ्यांना मिळणार पोर्तुगालला जायची संधी; क्विझ काँटेस्टचे आयोजन

मुरगाव बंदर प्राधिकरणाने पर्यटन विभागाला दिलेल्या माहितीनुसार, राज्याला भेट देणार्‍या क्रूझ जहाजांमध्ये रेझिलिएंट लेडी, वास्को-द-गामा, मरेला डिस्कव्हरी 2, सिल्व्हर मून, सेव्हन सीज नेव्हिगेटर, सेलिब्रिटी मिलेनियम, बोलेट, नॉटिका,

रिव्हिएरा, ली जॅक्स कार्टर, सिल्व्हर व्हिस्पर, बोरियालीस, क्रिस्टल सिंफनी, वायकिंग स्काय, आणि असुका 2 इत्यादी क्रूझचा समावेश होता.

याशिवाय, देशांतर्गत क्रूझ लाइनर एमव्ही एम्प्रेस देखील मुरगाव बंदरात येणार आहे. ही क्रूझ कॉर्डेलिया क्रूझच्या मालकीची आहे.

प्रवाशांच्या स्वागतासाठी एजन्सी नेमण्याची पर्यटन विभागाची योजना आहे. संगीत आणि रेड कार्पेट स्वागतासोबत, एजन्सीला आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजांसाठी बंदरावर गोव्याची कला आणि संस्कृती प्रदर्शित करावी लागेल.

सर्वात कमी निविदा असलेल्या कंपनीला कंत्राट दिले जाईल, अशी माहिती आहे.

Goa Cruise Vessels | Tourism Season
माका नाका प्लॅस्टिक! गोव्यातील अवलियाने थांबवला 20 लाख प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर...

या महिन्याच्या सुरुवातीला, जीएसटी कौन्सिलने सहा महिन्यांचा कालावधी असलेल्या पर्यटन हंगामात भारताच्या किनारी मार्गावर समुद्रपर्यटन केल्यास आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजांवर जीएसटीत सूट देण्याचा निर्णय घेतला.

साधारणपणे, आंतरराष्ट्रीय समुद्रपर्यटन जहाजांवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो. परंतु परदेशी जाणाऱ्या जहाजांनी भारतात सहा महिन्यांसाठी किनारी समुद्रपर्यटन चालवल्यास त्यांना IGST भरण्यापासून सूट मिळेल.

मुरगाव बंदरात या वर्षी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी मिळून 72 क्रूझ जहाजे येणार आहेत. दरम्यान, पर्यटन हंगामातील पहिले देशांतर्गत क्रूझ 24 सप्टेंबर रोजी 218 प्रवाशांसह मुरगाव बंदरावर दाखल झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com