Goa Congress MLA Dainik Gomantak
गोवा

Goa Michel Lobo|'काँग्रेस छोडो, भाजप जोडो'; भाजपमय मायकल लोबोंचा नवा नारा

काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये दाखल

दैनिक गोमन्तक

पणजी: पक्षांतर विरोधी तरतुदी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या आठ काँग्रेस आमदारांना एकत्र आणण्यात यश आले. सत्ताधारी भाजपमध्ये सामील होण्याच्या काही असंतुष्ट काँग्रेस आमदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आठ काँग्रेस आमदारांनी पक्षातून फारकत घेत भाजप पक्षात दाखल झाले आहेत. यावर मायकल लोबों यांनी प्रतिक्रीया दिली असून, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे असे ते म्हणाले.

(Michael Lobo's reaction to the defection of eight Congress MLAs)

'काँग्रेस छोडो, भाजपा को जोडो' असा नारा देत माजी काँग्रेस आमदार मायकल लोबोंसह सात आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

मायकेल लोबो, दिगंबर कामत, अलेक्सो सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर आणि डेलिला लोबो या आठ काँग्रेस आमदारांनी आज सकाळी विधानसभा संकुलात भेट घेतली आणि काँग्रेस पक्षातून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची त्यांच्या चेंबरमध्ये भेट घेतली आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली.

सभापती रमेश तवडकर गोव्याला रवाना

त्यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता विधिमंडळ विभागाच्या सचिव कार्यालयात सुरू आहे. राष्ट्रीय राजधानीत असलेले सभापती रमेश तवडकर ताज्या राजकीय घडामोडी लक्षात घेऊन पुन्हा गोव्याला रवाना होत आहेत. 8 काँग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश पूर्ण झाला असून, काँग्रेसकडे युरी आलेमाओ, अल्टॉन डिकॉस्टा आणि कार्लुस फेरेरा हे फक्त तीन आमदार उरतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT