Michael Lobo Resigns from BJP Dainik Gomantak
गोवा

मायकल लोबोंचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा

भाजपच्या आमदारकीचाही राजीनामा, आज काँग्रेस प्रवेशाची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपचे कळंगुटमधील आमदार आणि ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी सकाळी आपला मंत्रिपदाचा राजीनामा त्यांना मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आमदारकीचाही राजीनामा लोबो यांनी विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. (Michael Lobo Resigns from BJP)

मायकल लोबो (Michael Lobo) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसवासी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिपद आणि आमदारकीच्या राजीनाम्यानंतर रविवारी लोबो काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी त्यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर भाजपसमोर (BJP) एक नवीन आव्हान उभं केलं आहे.

मी गोव्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कळंगुट मतदारसंघातील लोक माझ्या निर्णयाचा आदर करतील अशी आशा आहे. मी आमदारकीचाही राजीनामा देत आहे. पुढे काय पाऊल टाकायचे ते बघू. इतर पक्षांशी चर्चा सुरु आहे, असं मायकल लोबो यांनी राजीनाम्यानंतर स्पष्ट केलं आहे.

दरम्यान मायकल लोबोंनी मुख्यमंत्री कार्य़ालयात राजीनामा सादर केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपविरोधात जाण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे. तसेच कळंगुटमधील (Calangute) जनतेची सेवा करत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. मायकल लोबोंनी आपली पत्नी डिलायला लोबो यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवोलीमध्ये डिलायला यांचा जोरात प्रचारही सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT