Michael Lobo explains why he Resigns from BJP in Goa Dainik Gomantak
गोवा

...म्हणून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, लोबोंचं स्पष्टीकरण

मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर नाराजी केली उघड, पक्षनेतृत्त्वावर थेट निशाणा

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपचे कळंगुटचे आमदार आणि विद्यमान सरकारमधील मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला. आपला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना मेलद्वारे पाठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयात दिल्यानंतर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. (Michael Lobo explains why he Resigns from BJP in Goa)

भाजप सोडण्याची आपली भूमिका राजीनामा सादर केल्यानंतर मायकल लोबो यांनी स्पष्ट केली आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता, कार्यकर्त्यांना पक्षामध्ये स्थान नाही म्हणून राजीनामा पक्षामध्ये देत असल्याचं लोबोंनी जाहीर केलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षामध्ये डावललं जात असल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. कार्यकर्त्यांनी आपली ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर आपण राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पक्ष मोठा झालाय, पण तो सामान्य कार्यकर्त्यांचा राहिलेला नाही, असा टोलाही लोबोंनी लगावला आहे.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांकडून साईडलाईन करण्याचा प्रकार सुरु आहे. सातत्याने पक्षाच्या नेत्यांकडे आपण याविषयी तक्रार केली, मात्र नेत्यांना आपला आवाजच ऐकू येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करुन हा राजीनाम्याचा निर्णय घेत असल्याचं लोबोंनी स्पष्ट केलं.सध्या इतर राजकीय पक्षांशी चर्चा सुरु आहेत असं सांगत काँग्रेसमध्येच प्रवेश करणार का याचं उत्तर लोबोंनी गुलदस्त्यात ठेवलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT