पणजी: कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी स्थानिक काँग्रेस नेते ग्लेन फर्नांडिस आणि सामाजिक कार्यकर्ते डेरिक गोन्साल्वीस यांना म्हापसा येथील सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे.
कळंगुट पोलिस ठाण्यात २४ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १३२, २२१, ३५१(३) सह कलम ३(५) अंतर्गत दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. कांदोळी येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकृत कामात अडथळा आणणे, तसेच कंत्राटदार आणि कामगारांना धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी तपास अधिकारी पीएसआय विश्वजीत ढवळीकर यांनी दोन्ही संशयितांना २५ सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यापूर्वीच २५ सप्टेंबर रोजी दोन्ही संशयितांनी आपल्या वकिलांमार्फत
म्हापसा सत्र न्यायालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम ४८२ अंतर्गत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत दोघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.